1 / 7जेव्हा आपण स्वयंपाकात किंवा सरबतासाठी लिंबू वापरतो तेव्हा त्याचा रस पिळून घेतो आणि सालं मात्र टाकून देतो. पण त्या सालांचं खूप चटपटीत लोणचं घालता येतं आणि ते ही अगदी सोप्या पद्धतीने.2 / 7लिंबाचा रस जेवढा पौैष्टिक असतो तेवढेच गुणधर्म त्याच्या सालांमध्येही असतात. त्यामुळे लिंबाचं लोणचं नेहमी सालांसकटच खावं असं सांगितलं जातं. त्यामुळेच आता त्या सालांचच लोणचं कसं घालायचं ते पाहूया...3 / 7यासाठी साधारण २०० ते २५० ग्रॅम एवढी काचेची बरणी घ्या. त्या बरणीमध्ये अर्धी वाटी साखर घाला.4 / 7आता त्यामध्ये १ चमचा मीठ आणि १ चमचा काळं मीठ घाला.5 / 7चवीसाठी थोडी जिरेपूड, ओवा आणि लाल तिखटही घालू शकता.6 / 7आता तुमच्याकडे लिंबाचा रस पिळल्यानंतर ज्या काही लिंबाच्या साली जमा होत जातील त्या या बरणीत टाकत चला आणि रोज बरणी एकदा वर- खाली या पद्धतीने हलवून घ्या.7 / 7काही दिवसांतच चटपटीत लोणचं तयार.... हे लोणचं अगदी ८ ते १० महिनेही चांगलं टिकतं. त्यासाठी कोणताही वेगळा मसाला वापरावा लागत नाही. एकदा करून पाहा.