Join us
Daily Top 2 Weekly Top 5

फिंगर चिप्स, स्प्रिंग पोटॅटोवरचा पेरी पेरी मसाला आवडतो? घ्या रेसिपी, विकतपेक्षाही टेस्टी मसाला आता घरीच करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2026 16:38 IST

1 / 8
पेरी पेरी मसाला घातलेले फिंगर चिप्स, स्प्रिंग पोटॅटो हे पदार्थ म्हणजे लहान मुलांच्या विशेष आवडीचे. कारण या मसाल्याला असणारी चव लहानांसकट मोठ्यांनाही खूप आवडते.
2 / 8
हा चवदार मसाला घरीच करणं अतिशय सोपं आहे. त्यासाठी आपल्या रोजच्या वापरातलेच काही मसाले एका विशिष्ट प्रमाणात घ्यायचे आहेत. त्यासाठी नेमकं काय करायचं ते पाहा..
3 / 8
सगळ्यात आधी तर लाल तिखट, गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला हे सगळं प्रत्येकी एकेक चमचा घ्या.
4 / 8
आता त्यामध्ये १ चमचा साखर घाला. साखरेमुळे मसाल्याला अतिशय चटपटीतपणा येतो.
5 / 8
आता त्यामध्ये १ चमचा आमचूर पावडर, १ चमचा मीठ आणि १ चमचा मिरेपूड घाला.
6 / 8
यानंतर त्यात आणखी एक पदार्थ घालायचा आहे आणि तो म्हणजे १ चमचा ओवा.
7 / 8
आता हे सगळे पदार्थ मिक्सरच्या भांड्यात घाला आणि एकत्र बारीक करून घ्या.
8 / 8
छान चटपटीत पेेरीपेरी मसाला तयार...आपल्या घरच्या कित्येक पदार्थांमध्येही तुम्ही हा मसाला घालू शकता. ही रेसिपी savitakitchenqueen या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
टॅग्स : अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स