Join us

लोक चहात बुडवून खातात चित्रविचित्र ८ पदार्थ, बिस्किट टोस्टच नाही या यादीत आहेत अजबगजब गोष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2025 18:03 IST

1 / 10
महाराष्ट्रात घरोघरी सकाळी नाश्त्याला काही खायला केलेले नसेल तर मग ठरलेला बेत म्हणजे चहा आणि त्यात बुडवायला जे काही असेल उपलब्ध ते. चहात बुडवण्यासाठी खास पदार्थ केले जातात. काही असे पदार्थही चहात बुडवले जातात ज्याची तुम्हाला कल्पनाही नसेल.
2 / 10
चहा सोबत बिस्कीट, टोस्ट, नानकटाई, कुकीज असे पदार्थ नेहमीच खाल्ले जातात. काही पदार्थ असेही आहेत जे उरले म्हणून किंवा काही जणांना चविष्ट वाटतात म्हणून चहासोबत खाल्ले जातात. जाणून घ्या कोणते पदार्थ आहेत.
3 / 10
चहासोबत पोळी खाल्ली जाते हे बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे. तुपावर परतलेली पोळी छान कुरकुरीत करायची आणि चहातून बुडवून खायची. अनेक जण आवडीने खातात.
4 / 10
दिवाळीला केली जाणारी भाजणीची चकली चहातून खातात. कुरकुरीत चकली चहात बुडवून मऊ करुन चहासोबत खाल्ली जाते.
5 / 10
काही जण इडली चहातून खातात. इडली हा लोकप्रिय पदार्थ आहे. चटणी व सांबारात बुडवून इडली खाल्ली जाते. मात्र इडली चहात बुडवून खाणारेही अनेक जण आहेत.
6 / 10
चहा आणि सुके पोहे ही लहानपणीची गोड आठवण आहे. चहात पोहे भिजवायचे आणि मग ते मऊ झालेले पोहे नाश्त्याला खायचे. काही जण पोहे परतून घेतात तर काही असेच घेतात.
7 / 10
वरण बट्टी हा खान्देशी पदार्थ फार प्रसिद्ध आहे. या पदार्थातील बट्टी चहात बुडवून खातात. रात्रीच्या जेवणातली उरलेली बट्टी सकाळी जरा गरम करायची आणि चहासोबत खायची.
8 / 10
विविध प्रकारचे पराठे केले जातात. त्यापैकी काही ठराविक पराठे चहात बुडवून खाल्ले जातात. मेथीचा पराठा, पालकाचा पराठा चहातून खातता. ताजा किंवा शीळा कसाही पराठा चालतो.
9 / 10
दिवाळीला केला जाणारा आणखी एक खाऊ चहात भिजवला जातो आणि खाल्ला जातो. तो म्हणजे तिखट शंकरपाळ्या. तिखट-मीठाच्या शंकरपाळ्या चहातून खाल्ला जातात.
10 / 10
ताजी पुरी जशी भाजी आणि खीरीशी मस्त लागते. तशीच उरलेली रात्रीची किंवा सकाळची पुरी चहातून मस्त लागते. कडक झालेल्या मऊ पडलेल्या तेलकट झालेल्या अशा पुऱ्या अजिबात टाकायची गरज नाही. चहासोबत मस्त खाल्या जातात. अनेक जण हे कॉम्बिनेशन आवडीने खातात.
टॅग्स : अन्नसोशल व्हायरलपाककृतीकिचन टिप्समहाराष्ट्र