गॅस पेटवूच नका, करा ६ झटपट पदार्थ मोजून ५ मिनिटांत! चव जबरदस्त, स्वयंपाक सोपा आणि गॅसची बचत
Updated:March 25, 2026 18:54 IST2026-03-25T18:49:06+5:302026-03-25T18:54:56+5:30
No-Cook Recipes in 5 Minutes: Save Gas, Save Time with 6 Quick & Tasty Dishes : गॅस न वापरता करा या रेसिपी, चविष्ट आणि झटपट.

जेवण तयार करायचं म्हणजे शिजवणं आलं, वाफवणं आलं, परतणं आलं आणि इतरही अनेक कृती आल्या. मात्र काही रेसिपी अशाही आहेत ज्या करण्यासाठी गॅसची गरजच लागत नाही. शिजवायची गरज नाही किंवा काही परतायचीही गरज नाही.
जसे की विविध प्रकारची सॅलेड्स. साधी कोशिंबीरी तर आपण करतोच मात्र विविध चवीची ड्रेसिंग्स तयार करुन पोटभरीचे सॅलेडही करता येते. फक्त भाज्या चिरण्याचे कष्ट असतात.
विविध प्रकारच्या चटण्या करण्यासाठी काहीही भाजायची किंवा परतायची गरज पडत नाही. फक्त मिक्सरमधून वाटून तयार करता येतात.
फ्रिझरमध्ये केकही तयार करता येतो. चीज घालून सगळं सामान मिक्सरमधून वाटून घ्या. त्यात मैद्याऐवजी बिस्कीटांचा चुरा घाला, घट्ट होईपर्यंत फ्रिजमध्ये ठेवा.
सॅण्डविच हा पदार्थ न परतता ही करता येतो. एकदम मस्त लागतो. दह्यात कालवलेल्या भाज्या त्यात भरा चव मस्त लागते.
शेव चुरमुऱ्यांचा चिवडा न परतता आणि न भाजताही करता येतो. आवडते मसाले त्यात घालायचे आणि त्यात लिंबूही पिळायचे. नक्की करुन पाहा.
उन्हाळ्यासाठी खास सरबतं आणि गारेगार पेयं तयार करण्यासाठी फक्त मिक्सर लागतो. बाकी काहीही लागत नाही. उन्हाळ्यात विविध गारेगार रेसिपी नक्की करुन पाहा.