1 / 8नवरात्रीच्या तिसर्या दिवशीचा रंग नीळा असून सगळे छान निळ्या रंगछटांचे कपडे घालतात. निळ्या रंगाचे फार पदार्थ पाहायला मिळाले नाही तरी काही चविष्ट पदार्थ नक्की असतात.2 / 8निळ्या रंगाचे मस्त चविष्ट असे पदार्थ पाहा आणि नक्की करा. विकतही सहज मिळतात. खास म्हणजे निळे पदार्थ छान फळांचे केले जातात. तसे तर निळा भातही असतो मात्र रंग घासून केलेले नाही तर मुळात निळे असणारे पदार्थ पाहा. 3 / 8निळ्या रंगाचा चहा कधी प्यायला का? फारच पौष्टिक असतो. गोकर्णाच्या फुलांचा केला जाणारा हा चहा आरोग्यासाठी फार फायद्याचा असतो. नक्की करुन पाहा. 4 / 8ब्लू बेरी चीजकेक फार लोकप्रिय आहे. आजकाल तरुणांमध्ये याचा सतत उल्लेख असतो. चवीला फार छान लागतो. तसेच सगळीकडे आरामात उपलब्ध होतो. 5 / 8निळ्या रंगाचे आइस्क्रिम मात्र सगळीकडे आरामात मिळते. काही ठिकाणी ब्लूबेरीचे तसेच जांभळाचे आइस्क्रिम मिळते. चवीला छान असते. रंगामुळे लहान मुलांना खास आवडते. 6 / 8निळ्या रंगाची स्मूदी तसेच मिल्कशेकही मिळते. काही वेळा रंग घातला जातो. मात्र नैसर्गिक निळी पेयही असतात. त्यात विविध फळांचे मिश्रण असते. 7 / 8निळ्या रंगाचे फ्लेवर्ड दही मिळते. ग्रीक योगर्ट आजकाल भारतातही फार लोकप्रिय आहे. त्यात अनेक प्रकार असतात. चवीला छान असते. बाजारात आता आरामात मिळते. 8 / 8ब्लॅक करंट आइस्क्रिम तसे फार प्रसिद्ध आहे. रंगाला मस्त निळसर असते. तसेच चवीला एकदम गोड आणि छान असते. तसेच ब्लॅक करंट ज्यूसही मिळतो.