Join us

Navratri Colours 2025 Yellow : पिवळ्या रंगाचे ९ पदार्थ, चवीला मस्त आणि आहारात असले की तब्येत ठेवतात कायम ठणठणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2025 13:37 IST

1 / 10
नवरात्रीच्या चौथ्या दिवसाचा रंग पिवळा आहे. पिवळा रंग अनेकांच्या आवडीचा असतो. फक्त कपडेच नाही तर या रंगाचे पदार्थही फार लोकप्रिय असतात. आपल्या जेवणाला चव देणार्‍या फोडणीचाही रंग पिवळाच.
2 / 10
पिवळ्या रंगाचे पदार्थ म्हटल्यावर सगळ्याच आधी डोळ्या समोर येते वरण. आरोग्यासाठी पौष्टिक आणि चवीला फारच छान असे हे वरण घरोघरी केले जाते. लहानपणापासून वरण सगळेच खातात. वरण, भात, तूप, लिंबू म्हणजे स्वर्गसुख.
3 / 10
पिवळ्या रंगाची कढी फार लोकप्रिय आहे. हा पदार्थ करायला अगदीच सोपा आहे. तसेच कढीचा भुरका मारुन प्यायला फार मजा येते. भातावरही कढी मस्त लागते.
4 / 10
नवरात्रीच्या दिवसांत खास पदार्थ म्हणजे ढोकळा. मस्त मऊ- जाळीदार ढोकळाही रंगाला पिवळाच. वाफवून केलेला हा ढोकळा. पौष्टिकही असतो. खास गुजराथी पदार्थ आहे.
5 / 10
भारतीय गोड पदार्थ जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यापैकीच एक म्हणजे जिलबी. गरमागरम जिलबी घ्या नाहीतर गारेगार चवीला मस्तच लागते.
6 / 10
घरी काही कार्यक्रम असला की एक भाजी ठरलेली असते. ती म्हणजे बटाट्याची भाजी. बटाट्याची उकडून केलेली भाजी चवीला मस्त असते. तसेच पुरी आणि ही भाजी हे कॉम्बिनेशन फार लोकप्रिय आहे.
7 / 10
महाराष्ट्रात नाश्त्याला घरोघरी केला जाणारा पदार्थ म्हणजे फोडणीचे पोहे. बटाटा पोहे करा किंवा कांदा पोहे. हे पोहे रंगाला पिवळे असतात तसेच सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ आहे.
8 / 10
पिवळ्या रंगाचा पारंपरिक पदार्थ म्हणजे भोपळ्याचे भरीत. दह्यात कालवून केलेले हे भोपळ्याचे भरीत भाकरीसोबत तसेच चपातीसोबत मस्त लागते. सणासुदीला करण्यासाठी छान पदार्थ आहे.
9 / 10
आवडीने खाल्ले जाणारे बेसनाचे गोडसर लाडूही रंगाला पिवळे. बेसनामुळे लाडू पिवळे दिसतात. तसेच साखर घालूनही करता येतात आणि गुळाचे लाडूही मस्त लागतात. बेसनाच्या लाडूचा डबा घरोघरी भरलेला असतो. दिवाळीत तर खास हे लाडू केले जातात.
10 / 10
महाराष्ट्रात फारच आवडीने खाल्ली जाणारी पुरणपोळी रंगाला छान पिवळी असते. पिठात हळद घातली जाते. तसेच पूरण रंगाला पिवळे असल्याने पुरणपोळी छान पिवळी दिसते. तुपासोबत ही पुरणपोळी फारच मस्त लागते.
टॅग्स : शारदीय नवरात्रोत्सव २०२५अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स