सण आयलाय गो नारळीपुनवेचा!! नारळीपौर्णिमेला करा नारळाचे खास ६ पदार्थ
Updated:August 4, 2025 16:09 IST2025-08-04T16:02:51+5:302025-08-04T16:09:57+5:30
Narilipurnima special, Rakshabandhan food, Make 6 special coconut dishes, coconut special recipes : नारळीपौर्णिमेला करा खास नारळाचे पदार्थ. पारंपरिक पदार्थांची ही घ्या यादी.

रक्षाबंधन हा दिवस आपण फार आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतो. त्याच दिवशी आणखी एक महत्वाचा दिवस असतो तो म्हणजे नारळीपौर्णिमा. खास म्हणजे कोळी बांधवांसाठी हा सण फार महत्त्वाचा असतो. पावसाळ्यात बंद असलेल्या बोटी पुन्हा समुद्रात उतरवायला सुरवात होते.
नारळी भात हा पदार्थ या दिवसाचा राजा असतो. घरोघरी चविष्ट असा गोड नारळी भात केला जातो. अर्थात सगळ्याची पद्धत वेगळी असते. हा पदार्थ करायला अगदीच सोपा आहे. नारळ, भात, साखर, वेलची, तूप, सुकामेवा आणि आवडीचे इतर पदार्थ एकत्र करुन केला जातो.
प्रसादासाठी नारळाचे लाडू केले जातात. काही घरी हे लाडू अगदी मऊ केले जातात. आजकाल डेसिकेटेड कोकोनटचे लाडूही केले जातात. सुक्या खोबर्याचे आणि ओल्या नारळाचे विविध प्रकारे लाडू केले जातात.
ताज्या नारळाची मस्त मऊ अशी बर्फी केली जाते. त्यात काही जणं गुलाबाच्या पाकळ्या घालतात तर काही जण बटाटाही घालतात. चवीला छान लागतात आणि करायला सोप्या असतात. खोबर्याचीही बर्फी केली जाते.
ओल्या नारळाच्या मस्त खुसखुशीत करंज्या खास नारळीपौर्णिमेला केल्या जातात. सुक्या सारणाच्या करंज्या दिवाळीला केल्या जातातचं. पण या ओल्या नारळाच्या करंज्यांची चव एकदम वेगळीच लागते. फार छान होतात.
नारळी पाक म्हणजेच नारळाची वडी केली जाते. विविध प्रकारे ही वडी केली जाते. नारळाची वडी करायला तशी फार सोपी आहे. खायची एकदा चटक लागली की हात आणि तोंड थांबतच नाही.
नारळाची खीर हा पदार्थ तसा फार प्रसिद्ध नाही. घराजवळ नारळाची झाडे असणार्यांकडे मात्र हा पदार्थ वरचेवर केला जातो. नारळाची खीर चवीला एकदम छान असते. नारळीपौर्णिमेला ही खीरही अनेक ठिकाणी केली जाते.