Join us
Daily Top 2 Weekly Top 5

गुरूवारी नैवेद्यासाठी करा स्वादीष्ट शेवयांची खीर; ७ टिप्स, घट्ट-रबडीसारखी परफेक्ट बनेल खीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 12:00 IST

1 / 8
मार्गशीर्ष गुरूवारच्या (Margashirsha Guruvar 2025 ) नैवेद्यासाठी तुम्ही स्वादीष्ट अशी शेवयांची खीर करू शकता. शेवयांची खीर परफेक्ट होण्याासठी काही सोप्या टिप्स पाहूया. (How To Make Sevai Kheer)
2 / 8
शेवया मंद आचेवर सोनेरी होईपर्यंत तुपात भाजून घ्या. यामुळे खीर चिकट होत नाही. (Sevai Kheer Recipe)
3 / 8
खीर करण्यासाठी फूल फॅट दूधाचा वापर करा ज्यामुळे खीर दाट आणि चविष्ट होते. दूध नेहमी व्यवस्थित गरम करून आणि थोडं आटवून मगच त्यात भाजलेल्या शेवया घाला. (Sevai Kheer Making Tips)
4 / 8
साखर नेहमी शेवया पूर्ण शिजल्यानंतर आणि गॅस बंद करण्यापूर्वी घालाव्यात. आधी घातल्यास शेवया शिजायला वेळ लागतो आणि कडक होतात.
5 / 8
शेवया दुधात घातल्यावर त्या तळाला लागू नयेत म्हणून सतत खीर ढवळत राहा.
6 / 8
खीर शिजवताना गॅसची आच मंद ते मध्यम असावी. जास्त आचेवर दूध उतू जाते किंवा तळाला लागते.
7 / 8
खीर जास्त घट्ट वाटल्यास त्यात दूध गरम करून त्यात थोड्याफार प्रमाणात मिसळा.
8 / 8
सुका मेवा खीर शिजल्यावर गॅस बंद करण्यापूर्वी घाला यामुळे खीर फाटत नाही. शेवया आणि दुधाचे प्रमाण योग्य असावे. १ भाग शेवयांसाठी ८ भाग दूध असावं.
टॅग्स : अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.भारतीय उत्सव-सण