Join us

मराठवाडा स्पेशल रेसिपी: झणझणीत मराठवाडी लसणाचा भुरका, महिनाभर टिकणारा पारंपरिक पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2025 18:26 IST

1 / 7
चटणी, लोणचं, ठेचा यापेक्षा तोंडी लावायला काहीतरी वेगळं हवं असेल तर तिखट आणि लसूण असणारा झणझणीत भुरका एकदा करून पाहाच..
2 / 7
भुरका करण्याची रेसिपी अतिशय सोपी असून अवघ्या ५ मिनिटांत झणझणीत भुरका तयार होऊ शकतो.
3 / 7
त्यासाठी सगळ्यात आधी भरपूर लसूण सोलून घ्या. कारण जेवढा जास्त लसूण तुम्ही त्यात घालाल तेवढा भुरका जास्त चवदार होतो. लसूणाच्या पाकळ्या जाड्याभरड्या ठेचून घ्या.
4 / 7
यानंतर गॅसवर लहान कढई गरम करायला ठेवा. त्यामध्ये २ चमचे तेल घाला. तेल तापल्यानंतर त्यात मोहरी घालून फोडणी करून घ्या.
5 / 7
फोडणी झाल्यानंतर साधारण १ चमचा ठेचलेला लसूण त्यामध्ये घाला. लसूण खमंग परतून लालसर झाल्यानंतर त्यात तीळ घाला.
6 / 7
तीळ परतून झाल्यानंतर त्यात २ टेबलस्पून लाल तिखट घाला. चवीनुसार मीठ घाला आणि त्यानंतर साधारण एखाद्या मिनिटाने गॅस बंद करा. तिखट अधूनमधून हलवत राहा.
7 / 7
मस्त झणझणीत चवीचा भुरका तयार. हा भुरका भाकरीसोबत विशेष चवदार लागतो. भुरका खाताना त्यासोबत कांदा तोंडी लावा. चव आणखी खुलेल.
टॅग्स : अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.मराठवाडा