1 / 7स्नॅक्सचे अनेक प्रकार आपण आवडीने खातो. त्यातील काही प्रकार घरीही करता येतात. त्यापैकी फार लोकप्रिय असा प्रकार म्हणजे वेफर्स. घरोघरी याचे पाकीट्स भरलेले असतात. तसेच घरी वेफर्स करणेही फार सोपे असते. 2 / 7विविध प्रकारचे वेफर्स बाजारात मिळतात. चवीला भारी असतात. मात्र विकतचे वेफर्स तळण्यासाठी वापरले गेलेले तेल चांगले नसते. त्यामुळे आरोग्याची हानी होते. घरी करता येणारे वेफर्सचे प्रकार पाहा कोणते आहेत. 3 / 7केळा वेफर्स हा फार प्रसिद्ध असा प्रकार आहे. दक्षिण भारतातून आलेला हा पदार्थ भारतभर आवडीने खाल्ला जातो. घरी केळा वेफर्स करणे फार सोपे आहे. तळण्यासाठी तेल खोबरेल वापरायचे म्हणजे विकतपेक्षा भारी घरीच तयार करता येतात. 4 / 7बटाटा वेफर्स करायला अगदीच सोपे आहेत. फक्त बटाटा पातळ चिरु घेतल्यावर कोरड्या फडक्यावर पसरवायचे आणि वाळवायचे. म्हणजे ते कुरकुरीत होतात. 5 / 7तिखट केळा वेफर्स करणेही सोपेच. त्यासाठी मात्र गोलाकार चकत्या न तयार करता लांबट करायच्या. तळून झाल्यावर त्याला मीठ, तिखट आणि चाट मसाला लावायचा. 6 / 7बटाटा वेफर्समध्ये अनेक प्रकार असतात. त्यापैकी एक मस्त प्रकार म्हणजे चीज लावलेले वेफर्स. जसे बटाटा वेफर्स तयार करता तसेच करायचे आणि नंतर चीज पावडरमध्ये घोळवायचे. 7 / 7घरी पालक बटाटा चीप्स करता येतात. त्यासाठी पालक शिजवायचा आणि त्याची पेस्ट तयार करायची. बटाटा किसून घ्यायचा. जरा शिजवायचा आणि पालक बटाट्याचे मिश्रण करायचे. पीठ मळायचे आणि मग त्याचे पातळ काप करायचे. तळायचे आणि साठवून ठेवायचे.