1 / 9बरेचदा भाजी करायचा किंवा आमटी करायचा कंटाळा येतो. काही वेळा कामाच्या घाई गडबडीत वेळ कमी पडतो. आजकाल अशावेळी अनेकजण बाहेरुन ऑर्डर करतात. मात्र घरीच अगदी पाच मिनिटांत तयार करता येणारे पदार्थही असतात. 2 / 9बाहेरचे खाण्याऐवजी हे पदार्थ घरीच झटपट करणे कधीही फायद्याचे. पाहा अशा ७ रेसिपी ज्या चविष्ट असतात आणि अगदी पाच मिनिटांत, कमी कष्टात करता येतात. 3 / 9चपाती असो वा भात दोन्ही सोबत दही मिरची फार मस्त लागते. करायला अगदी सोपी आहे. फोडणी तयार करा त्यात हिरव्या मिरचीचे लांब काप परता आणि ती फोडणी छान ताज्या दह्यात मिक्स करा. फार छान लागते. 4 / 9जर तिखट खायचे नसेल आणि गोड आवडते तर मग चपातीशी दही साखर खाणे हा मस्त पर्याय आहे. अनेक जण दही साखर पोळी खातात. ताज्या गोड दह्यात चमचाभर साखर घालायचे चपातीशी खायचे एकदम मस्त लागते. 5 / 9वर्षानुवर्षे घरोघरी केळीचे शिकरण केले जात आहे. भाजी नसेल तर चपातीसोबत खाण्यासाठी करता येते तसेच गोडाचा पदार्थ म्हणूनही करु शकता. केळी दुधात कुस्करायची. त्यावर थोडे तूप घालायचे. फार मस्त लागते.6 / 9झणझणीत ठेचा करायला अगदीच सोपा. शेंगदाणे, मिरची, लसूण एकत्रच भाजा किंवा परता. मस्त ठेचून घ्या. कोथिंबीर आणि इतरही पदार्थ घालू शकता. ठेचा भाकरी , ठेचा चपाती सगळ्यासोबत ठेचा मस्त लागतो.7 / 9कधी घरातील भाज्या संपल्या असतील तर कांद्याची भाजी करा. साधी फोडणी तयार करायची. त्याला लसूण, टोमॅटोचे वाटण लावायचे. कांद्याच्या फोडी घालून मस्त शिजवायचे. फार चविष्ट लागते. 8 / 9लहान मुलांना द्यायला किंवा वृद्ध व्यक्तींना द्यायला केली जाणारी दूध साखर पोळी फार चविष्ट लागते. दुधात साखर घालायची आणि चपातीचे तुकडे घालायचे. मुरत ठेवायची. चपातीने दूध शोषल्यावर खायची. चवीला मस्तच लागते. 9 / 9तिखट मीठाची पोळी नक्की करुन पाहा. तयार चपातीला तिखट आणि मीठ लावायचे. तुपावर परतायचे आवडत असेल तर कोथिंबीरही लावायची. फार छान लागते. डब्यालाही देऊ शकता.