Join us

कोकम आगळ किंवा अर्क न वापरता करा कोकमाचे सरबत, चवीला मस्त आणि पोटासाठी गारेगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2025 08:30 IST

1 / 8
उन्हाळ्यामध्ये कोकम सरबत तर प्यायलाच हवे. महाराष्ट्रामध्ये घरोघरी हे सरबत प्यायले जाते. पाहुण्यांनाही चहा घेणार का कोकम सरबत असे विचारायची पद्धत आपल्याकडे आहे. उन्हापासून शरीराचे रक्षण करण्यासाठी कोकम सरबत उपयुक्त ठरते.
2 / 8
कोकम हा अँण्टी ऑक्सिडंट्सने भरलेला पदार्थ आहे. तसेच पचन सुरळीत व्हावे यासाठी कोकम उत्तम असते. शरीराला थंडावा मिळतो. तसेच शरीर हायड्रेटेड राहते.
3 / 8
कोकम सरबत तयार करण्यासाठी ही पद्धत वापरून पाहा, सरबत मस्त चविष्ट होईल. १० ते १२ आमसुले घ्या. दोन वाट्या पाणी घ्या. दोन चमचे साखर घ्या. चमचाभर मीठ आणि तेवढीच जिरे पूड घ्या. थोडी काळीमिरी पूडही वापरा.
4 / 8
किमान अर्धा तास तरी आमसुले पाण्यामध्ये भिजत ठेवा. पाण्यामध्ये कोकमाचा अर्क आणि रंग उतरायला लागेल. जास्त वेळ ठेवलेत तरी चालेल मात्र अर्ध्या तासापेक्षा कमी वेळ ठेऊ नका.
5 / 8
आमसुल व्यवस्थित भिजल्यानंतर पाण्यासकट मिक्सरच्या भांड्यामध्ये ओता. सगळं व्यवस्थित एकजीव होईपर्यंत फिरवा. नंतर तुम्हाला हवं तर गाळून घ्या. न गाळता वापरले तरी चालेल.
6 / 8
तयार मिश्रणामध्ये दोन चमचे साखर घाला. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर जास्त साखर वापरा. मीठ घाला. तसेच जिरे पूड घाला आणि सगळं छान मिक्स करून घ्या.
7 / 8
तयार केलेले सरबत थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवा किमान तासभर तरी राहू द्या. म्हणजे ते छान गार होईल. जर तुम्हाला लगेच पटकन प्यायचे असेल तर, त्यामध्ये बर्फ घाला आणि प्या. सरबत गार असेल तर प्यायला मज्जा येते.
8 / 8
भांड्यामध्ये सरबत ओतून घेतल्यावर त्यावरती पुदिन्याची पाने किंवा मग तुळशीची पाने टाकू शकता. जिरे पूडही टाकू शकता. दिसायला छान दिसते चवीलाही छान लागते.
टॅग्स : समर स्पेशलफळेआरोग्यपाककृतीअन्न