1 / 8पुरी हा भारतीय स्वयंपाक घरात वारंवार केला जाणारा पदार्थ आहे. एखादा सण आला की लगेच पोळीची जागा पुरी घेते. छान टम्म फुगलेल्या पुऱ्या खायला मज्जाच येते. मात्र पुरी करायचे प्रकार तुम्हाला माहिती आहेत का ?2 / 8साधी तळणीची पुरी तर केली जातेच मात्र इतरही काही प्रकार आहेत जे फार चविष्ट असतात. तसेच करायला सोपे आणि नाश्त्यासाठीही उत्तम असतात. 3 / 8जसे की पालक पुरी. पालक शिजवून त्याची पेस्ट करायची. गव्हाच्या पिठात मिक्स करायची आणि छान पीठ मळायचे. चवीला अगदीच मस्त लागते. बाकी साधी पुरी लाटता तशीच लाटायची. भिजवताना पाणी कमी वापरायचे.4 / 8तिखट-मीठाची पुरी वर्षानुवर्षे केली जात आहे. चहासोबत खायला या पुऱ्या एकदम मस्त लागतात. त्यात कोथिंबीर घालता येते. तसेच कसूरी मेथीही घालतात. 5 / 8बटाट्याची पुरी चवीला एकदम छान लागते. त्यात मस्त मसाले आणि रवा घालायचा. बाकी पीठ हवे ते वापरा. तांदूळही वापरु शकता किंवा गव्हाचे पीठही वापरु शकता. 6 / 8गोडाच्या पुऱ्या ज्याला पाकातल्या पुऱ्या असे म्हटले जाते. त्या करायला अगदीच सोप्या. पुरी तळल्यावर पाकातून बुडवून काढायची. एक झटपट होणारा गोड पदार्थ म्हणून पाकातली पुरी नक्की करा. 7 / 8करायला सोपी आणि चहासोबत खायला मस्त अशी पुरी म्हणजे मेथीची पुरी. झटपट होते आणि सगळ्यांना नक्की आवडेल. मेथी बारीक चिरुन पिठात घालायची. 8 / 8पोह्याची पुरी करता येते. भिजवलेले पोहे वाटून घ्यायचे. त्यात इतर साहित्य घालून त्याचे पीठ मळायचे. ही पुरी फार छान लागते. नक्की करुन पाहा.