महाशिवरात्र स्पेशल : उपवासाचे ९ चमचमीत पदार्थ, पचायला हलके आणि पौष्टिक, उपवास बाधणार नाही

Published:March 6, 2024 03:25 PM2024-03-06T15:25:09+5:302024-03-07T11:12:53+5:30

Mahashivratri Vrat Special| 9 Fasting Recipes for Mahashivratri : महाशिवरात्रीला करा उपवासाचे तिखट गोड खास पदार्थ..

महाशिवरात्र स्पेशल : उपवासाचे ९ चमचमीत पदार्थ, पचायला हलके आणि पौष्टिक, उपवास बाधणार नाही

बमबम भोले म्हणत भक्तगण आनंदाने महाशिवरात्री (Mahashivratri) साजरा करतील. फक्त महाराष्ट्रात नसून, देशभरात महाशिवरात्री उत्साहाने साजरा करण्यात येते. यंदा महाशिवरात्री ८ मार्च रोजी येत आहे. या दिवशी बरेच जण उपवास धरतात. यासह पूजाही करतात. उपवास म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर फक्त साबुदाण्याची खिचडी येते. परंतु, फक्त साबुदाण्याची खिचडी न करता आपण विविध प्रकारचे चविष्ट यासह हेल्दी पदार्थ खाऊन उपवास धरू शकता. अस्सल खवय्यांनो उपवासाच्या निमित्ताने हटके पदार्थ खाण्याची इच्छा होत असेल तर, हे ९ प्रकारचे पदार्थ नक्कीच ट्राय करून पाहा(Mahashivratri Vrat Special| 9 Fasting Recipes for Mahashivratri).

महाशिवरात्र स्पेशल : उपवासाचे ९ चमचमीत पदार्थ, पचायला हलके आणि पौष्टिक, उपवास बाधणार नाही

उपवास कोणताही आणि कोणाचाही असो, भारतात साबुदाण्याची खिचडी आवर्जून केली जाते. मोत्याच्या दाण्याप्रमाणे साबुदाण्याला, बटाटा, हिरवी मिरची आणि शेंगदाण्याची फोडणी देऊन तयार केली जाते. साबुदाणा खिचडी आपण विविध प्रकारे करून खाऊ शकता.

महाशिवरात्र स्पेशल : उपवासाचे ९ चमचमीत पदार्थ, पचायला हलके आणि पौष्टिक, उपवास बाधणार नाही

जर आपल्याला साबुदाण्याची खिचडी आवडत नसेल तर, किंवा काही तरी वेगळं ट्राय करायचं असेल तर, साबुदाणे वडे करून खा. आतून सॉफ्ट बाहेरून क्रिस्पी असे साबुदाणे वडे आपल्याला नक्की आवडतील. जर वडे तळताना जास्त तेल पीत असेल तर, त्यात उकडलेल्या बटाट्याचा वापर कमी करा.

महाशिवरात्र स्पेशल : उपवासाचे ९ चमचमीत पदार्थ, पचायला हलके आणि पौष्टिक, उपवास बाधणार नाही

काहींना साबुदाणे पचत नाही. जर आपल्यालाही साबुदाणे पचत नसेल तर, हलकी-फुलकी भगरची इडली करून खा. भगरची खिचडी आपण खातोच, पण एकदा झटपट तयार होणारी भगरची इडली करून खा. पचायला हलकी, बनवायला सोपी आणि वेट लॉस करत असलेल्यांसाठी फायदेशीर ठरते.

महाशिवरात्र स्पेशल : उपवासाचे ९ चमचमीत पदार्थ, पचायला हलके आणि पौष्टिक, उपवास बाधणार नाही

साबुदाण्याचे वडे आपण खाल्लेच असेल, पण कधी फराळी पॅटिस ही रेसिपी ट्राय करून पाहिली आहे का? आतून मस्त मऊ बाहेरून क्रिस्पी असा हा पदार्थ खाताच जिभेची चव वाढते. शिवाय पोट देखील गच्च भरते. हे पॅटिस तयार करताना विशेष मेहनत घ्यावी लागत नाही. मोजक्या साहित्यात क्रिस्पी फराळी पॅटिस काही मिनिटात तयार होतात.

महाशिवरात्र स्पेशल : उपवासाचे ९ चमचमीत पदार्थ, पचायला हलके आणि पौष्टिक, उपवास बाधणार नाही

जर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर, साबुदाणा, भगर याव्यतिरिक्त फ्रुट सॅलॅड खा. विविध प्रकारचे फळे चिरून त्यावर आपण चिमुटभर सैंधव मीठ मिक्स करून खाऊ शकता. फ्रुट सॅलॅडमुळे शरीराला दिवसभर काम करण्याची उर्जा मिळेल. पौष्टीक घटक मिळतील. यासह वेट लॉससाठीही मदत होईल.

महाशिवरात्र स्पेशल : उपवासाचे ९ चमचमीत पदार्थ, पचायला हलके आणि पौष्टिक, उपवास बाधणार नाही

काही जण साबुदाणा खिचडी, वडे करण्याऐवजी साबुदाण्याचे थालीपीठ तयार करतात. भिजलेल्या साबुदाण्यामध्ये उकडलेले बटाटे, हिरवी मिरची, शेंगदाण्याचं कूट घालून मिक्स करून थालीपीठ तयार करण्यात येते. क्रिस्पी असे उपवासाचे थालीपीठ आपल्याला नक्की आवडतील.

महाशिवरात्र स्पेशल : उपवासाचे ९ चमचमीत पदार्थ, पचायला हलके आणि पौष्टिक, उपवास बाधणार नाही

प्रत्येकाला भगरची खिचडी जमेलच असे नाही. बऱ्याचदा त्याचा गचका होतो, किंवा भगर व्यवस्थित शिजत नाही. जर आपल्यासोबतही असेच घडत असेल तर, शिजत असताना कोमट पाणी घाला. यामुळे भगरची खिचडी सुटसुटीत शिजेल. आपण त्यात बटाटे, शेंगदाण्याचं कूट किंवा हिरवी मिरची देखील घालू शकता.

महाशिवरात्र स्पेशल : उपवासाचे ९ चमचमीत पदार्थ, पचायला हलके आणि पौष्टिक, उपवास बाधणार नाही

उपवासानिमित्त आपण राजगिराची मऊसुत चपाती तयार करू शकता. राजगिराची चपाती खाल्ल्याने वजन वाढत नाही, शिवाय पचायला देखील हलकी असते. आपण राजगिराच्या हलक्या-फुलक्या चपात्यासह बटाट्याची तिखट भाजी खाऊ शकता.

महाशिवरात्र स्पेशल : उपवासाचे ९ चमचमीत पदार्थ, पचायला हलके आणि पौष्टिक, उपवास बाधणार नाही

जर आपल्याला तिखट-झणझणीत नसून, हलकं-फुलकं गोड खाण्याची इच्छा होत असेल तर, साबुदाण्याची खीर तयार करून खा. साबुदाणा आपण दुधात शिजवू शकता. दुधात आपण आवडीनुसार साखर, ड्रायफ्रुट्स, वेलची पूड आणि केसर मिक्स करून साबुदाण्याची गोडसर खीर तयार करू शकता.