1 / 9नाश्त्याला काय करायचे ? अचानक घरी पाहुणे आल्यावर त्यांना खायला काय द्यायचे ? एखादा दिवस रात्रीच्या जेवणाला काहीच शिल्लक नाही मग पटकन काय करायचे ? या सगळ्या प्रश्नांचे उत्तर पोहे असे अनेकांकडे असेल.2 / 9पोह्यांचे मस्त विविध प्रकार करता येतात. साधे फोडणीचे पोहे तर घरोघरी केले जातातच. मात्र त्याऐवजीही काही पदार्थ आहेत जे झटपट करता येतात. चवीला तर एकदम भारी असतात आणि करायलाही सोपे. पाहा पोह्यांच्या रेसिपी. 3 / 9वांगी पोहे हा पदार्थ तसा फार लोकप्रिय नाही. अनेकांना माहिती ही नसतो. मात्र हा पोह्यांचा प्रकार म्हणजे एक पारंपरिक रेसिपी आहे. जी एकदा नक्की करुन पाहायला हवी. फोडणीच्या पोह्यांप्रमाणेच कृती असते मात्र चव जरा वेगळी लागते. 4 / 9नारळाच्या दुधातले पोहे हा एक झटपट होणारा असा गोडाचा पदार्थ आहे. दुधात साखर पोहे भिजवायचे आणि मस्त मुरल्यावर खायचे अगदी सोपी आणि मस्त रेसिपी आहे. 5 / 9दही पोहे हा पदार्थ गोकुळाष्टमीला खास केला जातो. गोपाळकाला करताना त्यात विविध पदार्थ घातले जातात. पोहे दह्यात भिजवून त्याला मस्त फोडणी दिली जाते. मस्त चविष्ट असा हा पदार्थ आंबट गोड तिखट सगळ्या चवींचे मिश्रण आहे. 6 / 9काकडी पोहे पोटासाठी एकदम थंड आणि आरामदायी असा पदार्थ आहे. नाश्त्यासाठी लहान मुलांना खाऊ म्हणून द्यायला एकदम परफेक्ट आहे. करायलाही सोपा आहे आणि झटपट होतो. 7 / 9दडपे पोहे तर सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ आहे. घरोघरी विविध पद्धतीने केला जातो. सगळ्याच रेसिपी एकदम मस्त लागतात. दडपे पोह्यांची खासियतच ही आहे की एखादा पदार्थ कमी असला तरी फरक पडत नाही ते छानच होतात. 8 / 9कोळाचे पोहे हा कोकणात केला जाणारा एक वेगळा आणि भन्नाट असा पदार्थ आहे. चिंच, गूळ, पोहे, तिखटाची फोडणी आदींचे मिश्रण करुन एकदम मस्त असे कोळाचे पोहे करता येतात. साध्या पारंपरिक रेसिपी पौष्टिक तर फार असतात. तसाच हा पदार्थ. 9 / 9श्रावणात फोडणीचे पोहे खाण्याची इच्छा झाल्यावर बटाटा पोहे केले जातात. हिरवी मिरची, कोथिंबीर, बटाटा असे पदार्थ वापरुन हे पोहे करता येतात. चवीला मस्त लागतात. वरतून छान ताजा नारळ घालायचा.