1 / 8आहारामध्ये चांगले पचेल असेच अन्न असावे. मात्र जिभेचे चोचलेही पुरवावे लागतात. त्यासाठी आपण चमचमीत, झणझणीत पदार्थ खातोच. पचनावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे काही पदार्थ आहारामध्ये असायलाच हवेत. 2 / 8जसे की झणझणीत पदार्थावर तूप घेतात किंवा लिंबू पिळतात. त्याच्या मागचे कारण म्हणजे तुपामुळे व लिंबामुळे पदार्थ पचायला जड असला तरी पचवता येतो. असेच काही पदार्थ आहारात असावेत ज्यामुळे जड पदार्थ खाल्यावर अपचन किंवा इतर त्रास होणार नाहीत.3 / 8बडीशेप खाल्याने पचन चांगले होते त्यामुळे जेवणानंतर आपण बडीशेप खातो. मात्र विड्याचे नुसते पान बडीशेपसोबत खाल्याने पोटाला आराम मिळतो. त्यामुळे काहीही न लावलेले नुसते विड्याचे पान जेवणानंतर खावे.4 / 8फोडणीमध्ये आपण कडीपत्ता टाकतो. कडीपत्ता पचनासाठी चांगला असतो. त्यामुळे फोडणीमध्ये ही पाने टाकायची असतात. फक्त सुगंधासाठी कडीपत्ता वापरला जात नाही. त्याची इतरही कारणे आहेत. 5 / 8हिंग फोडणीमध्ये वापरले जाते तसेच जिरेही वापरले जाते. हे दोन्ही पदार्थ पचनसंस्थेचे काम सुरळीत व्हावे यासाठी मदत करतात. त्यामुळे एखादा पदार्थ करताना त्यामध्ये हिंग टाकायला विसरु नका.6 / 8दोडक्याची भाजी फार लोकप्रिय नाही. ही भाजी खायला लोकांना आवडत नाही. मात्र दोडकं पचनासाठी फार उपयुक्त असते. त्यामुळे आहारामध्ये त्याचा समावेश असणे चांगले आहे.7 / 8पोट दुखत असले की आई ओवा खायला देते. ओवा पचनासाठी तसेच गॅसेस कमी करण्यासाठी औषधी आहे. ब्लोटींगही कमी होते. गरम पाण्यातून ओवा खाणे फायद्याचे ठरते. पदार्थांमध्ये चिमूटभर ओवा टाकावा.8 / 8घरामध्ये आमसूल असते. ते अगदी कमी वापरले जाते. आमसुल पचनासाठी चांगले असते. त्यामुळे आमटीमध्ये भाजीमध्ये आमसुलाचा एक लहानसा तुकडा टाकणेसुद्धा फायद्याचे असते.