सकाळी चपात्या केल्या की दुपारपर्यंत वातड होतात? ८ टिप्स, २ दिवस राहतील मऊ, लुसलुशीत राहतील
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 14:22 IST
1 / 8चपात्यांचे पीठ मळताना नेहमी कोमट पाणी किंवा कोमट दुधाचा वापर करा. यामुळे पीठ अधिक मऊ होते. पीठ मळताना तुम्ही दुधाची सायसुद्धा वापरू शकता. साईमधील नैसर्गिक फॅट चपात्यांना मऊपणा देते. ( How To Keep Roti Worm)2 / 8 पीठ मळताना एक चिमूटभर बेकिंग सोडा वापरा. बेकींग सो़ड्यामुळे पीठ हलके आणि जाळीदार बनते ज्यामुळे चपाती थंड झाल्यावरही कडक होत नाही.(How To Keep Soft Roti For Next Day)3 / 8गोळा लाटण्यापूर्वी त्यावर तेल किवा तूप लावताना फक्त मध्यभागी लावा. कडांना लावू नका. यामुळे चपातीची घडी चांगली होते आणि ती फुगताना चांगली हवा आत पकडते. (How To Remain Roti Soft For Long Time)4 / 8चपात्या भाजून झाल्यावर लगेच डब्यात न ठेवता एका गरम पाण्याची वाफ येत असलेल्या पातेल्याच्या जाळीवर ठेवा. फक्त १० सेकंदांसाठी ठेवा. ही वाफ चपातीमधये अधिक ओलावा शोषून घेण्यास मदत करते. त्यानंतर लगेचच हवाबंद डब्यात ठेवा.5 / 8पीठ मळताना अर्धा चमचा ताजं दही किंवा एक ते दोन थेंब लिंबाचा रस घाला. यातील एसिड पिठातील ग्लुटेनला अधिक लवचिक बनवते. ज्यामुले चपात्यांचा कोरडेपणा कमी होतो6 / 8चपात्या हवाबंद डब्यात ठेवण्यापूर्वी प्रत्येक १० चपात्यांचा एक गठ्ठा एल्युमिनियम फॉईल पेपरमध्ये घट्ट गुंडाळा. चपात्यांमधील उष्णता आणि ओलावा प्रभावीप्रमाणे आत लॉक करता ये7 / 8चपात्या थेट गॅसच्या आगीवर फुगवण्याऐवजी त्या तव्यावर असतानाच कापडानं दाबून फुगवा. थेट आगीमुळे चपातीचा बाहेरील भाग अधिक कोरडा आणि कडक होतो.8 / 8चपाती भाजताना तवा खूप गरम नसावा. तवा मध्यम आचेवर गरम ठेवावा अति गरम तव्यावर चपाती पटकन जळते आणि आतून कच्ची राहते. ज्यामुळे ती लवकर कडक होते.