By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 16:17 IST
1 / 9सांबारला हॉटेलसारखी अस्सल चव आणि सुंगध येण्यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता. (How To Make Udupi style sambar at home)2 / 9 सांबारसाठी नेहमी चांगल्या प्रतीची तूप डाळ वापरा आणि ती पूर्णपणे मऊ शिजवून व्यवस्थित घोटून घ्या. (Easy Way To Make Udupi Style Sambar At Home)3 / 9शेवग्याच्या शेंगा, लाल भोपळा आणि छोटे कांदे यांचा वापर केल्यास सांबारला नैसर्गिक चव येते. 4 / 9सांबार मसाला फोडणीत जळू न देता तो डाळ आणि भाज्या उकळताना घालावा म्हणजे सुगंध टिकून राहतो.5 / 9सांबारची चव संतुलित राहण्यासाठी त्याच चिंचेचा कोळ आणि चवीपुरता गूळ आवर्जून घाला.6 / 9फोडणी देताना खोबरेल तेल किंवा तुपाचा वापर करा आणि त्यात भरपूर कढीपत्ता, हिंग आणि मोहोरी घाला.7 / 9सांबार मसाला घातल्यानंतर तो मंद आचेवर किमान १० ते १५ मिनिटं उकळू द्या. ज्यामुळे मसाल्यांचा अर्क डाळीत नीट उतरतो. 8 / 9हॉटेलसारखा लाल रंग हवा असेल तर फोडणीत थोडं कश्मिरी लाल तिखटाचा वापर करा.9 / 9सांबार तयार झाल्यावर शेवटी वरून भरपूर ताजी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. ज्यामुळे सांबारला छान चव येईल.