मलाईदार, रबडीसारखी बासुंदी करण्याची खास ट्रिक; जास्त गॅस न वापरता घट्ट होईल बासुंदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 12:10 IST
1 / 7घरी केलेली बासुंदी घट्ट होत नाही. गॅस तासनतास वाया जातो. त्यामुळे बरेचजण घरी बासुंदी करणं टाळतात. घरच्याघरी परफेक्ट बासुंदी करण्यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया. (How To Make Thick Basundi At Home)2 / 7बासुंदीसाठी नेहमी फुल क्रिम दुध निवडा. ज्यामुळे बासुंदी लवकर घट्ट होते.3 / 7 दुधात पाण्याचा अंश कमी असावी. दूध नेहमी मंद किंवा मध्यम आचेवर शिजवावं यामुळे दूध हळूहळू आटतं आणि नैसर्गिकरित्या दाटपणा येतो.4 / 7 बासुंदी करण्यासाठी रुंद तोंडाचे आणि जाड बुडाचे भांडे वापरा. रूंद तोंडाच्या भांड्यात दूध लवकर आटतं.5 / 7दूध उकळवताना भांड्याच्या कडांवर जी साय जमा होते ती चमच्यानं खरडून पुन्ही दुधात मिसला ज्यामुळे बासुंदी रवाळ होते.6 / 7गरम दुधात थोडी मिल्क पावडर मिसळून त्याची गुठळी होणार नाही याची काळजी घ्या. ज्यामुळे दूध त्वरीत घट्ट होते आणि चवही छान येते.7 / 7बासुंदी गरम असताना थोडी पातळ वाटू शकते पण गॅस बंद केल्यावर बरोबर घट्टपणा येईल.