अण्णाच्या गाडीवर मिळतो तसा कुरकुरीत मेदू वडा घरीच करा; ७ ट्रिक्स, परफेक्ट होतील वडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 15:35 IST
1 / 10विकत मिळतो तसा कुरकुरीत, गोल गरगरीत मेदू वडा घरीच करणं खूपच सोपं आहे त्यासाठी काही टिप्स पाहूया. (How to make south indian style medu vada)2 / 10 वड्यांसाठी फक्त उडीद डाळ वापरा. ही डाळ किमान ४ ते ५ तास किंवा रात्रभर पुरेशी भिजवत ठेवा. (Medu vada Making Tips)3 / 10डाळ वाटताना मिक्सरमध्ये अगदी थोड्या पाण्याचा वापर करा. पीठ अगदी घट्ट आणि मऊसर असंल पाहिले. पातळ पीठ झाल्यास वडा गोल होणार नाही.4 / 10 पीठ वाटल्यावर ते एका दिशेनं चांगलं फेटून घ्या. यामुळे पिठात हवा भरते आणि वडा हलका आणि फुललेला बनतो.5 / 10पीठ फेटले आहे की नाही हे तपासण्यासाठी थोडं पाणी पाण्यात टाका. पीठ तरंगले तर ते योग्यरित्या फेटले गेले आहे.6 / 10पिठात बारीक चिरलेला कांदा, आलं, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घाला यामुळे परफेक्ट चव येते. 7 / 10वडा तळण्यापूर्वी हाताला पाणी, तेल लावा. यामुळे पीठ हाताला चिकटत नाही आणि त्याला गोल आकार येतो.वड्याला गोल छिद्र पाडल्यानं तो आतून आणि बाहेरून समानपणे तळला जातो आणि कुरकुरीत होतो.8 / 10वडे तळण्यासाठी तेल मध्यम गरम असावे. तेल खूप जास्त गरम असल्यास वडा बाहेरून लगेच करपतो आणि आतून कच्चा राहतो.9 / 10मंद ते मध्य आचेवर वडे सोनेरी होईपर्यंत तळा. यामुळे तो बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ होतो.10 / 10शक्य असल्या वड्याच्या पिठात खाण्याचा सोडा वापरणं टाळा. कारण फेटलेल्या पिठानं नैसर्गिकरित्या वडा फुलतो.