Join us

हॉटेलसारखी परफेक्ट ओल्या खोबऱ्याची चटणी करण्याच्या ७ टिप्स, इडली-डोसा तरच लागेल मस्त चविष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 17:09 IST

1 / 8
साऊथ इंडियन (South Indian Style Chutney) स्टाईलची नारळाची चटणी खायला सर्वांनाच आवडते. नारळाची चटणी घरी केल्यावर ती हॉटेलसारखी बनत नाही अशी तक्रार बऱ्याचजणांची असते. हॉटेलस्टाईल चटणी करण्यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया. (Coconut Chutney Recipe)
2 / 8
ओल्या नारळाची चटणी करण्यासाठी नेहमी पांढरेशुभ्र खोबरं वापरा. खोबऱ्यासोबत फुटाण्याची डाळ आवश्यक प्रमाणात घाला यामुळे चटणीला हॉटेलसारखा घट्टपणा येतो आणि खास चव येते.
3 / 8
आल्याचा छोटा तुकडा आणि हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार घाला. यामुळे चटणीला तिखटपणा आणि चांगली चव येते.
4 / 8
थोडं दही किंवा लिंबाचा रस घातल्यास आंबटपणा येतो. ज्यामुळे चटणीची चव अधिक वाढते.
5 / 8
प्रथम नारळ, डाळवं, मिरची, आलं, मीठ आणि साखर पाण्याशिवाय जाडसर वाटून घ्या. नंतर थोडं थोडं पाणी घालून एकदम गुळगुळीत होईपर्यंत बारीक पेस्ट तयार करून घ्या.
6 / 8
तुम्हाला हवी तशी घट्ट चटणी करण्यासाठी पाण्याचं प्रमाण जपून वापरा. कोथिंबीर अगदी कमी वापरल्यास चटणीचा रंग पांढरा राहतो ज्यामुळे ती हॉटेलस्टाईल दिसते.
7 / 8
फोडणीसाठी तेल व्यवस्थित गरम करून त्यात मोहरी तडतडू द्या. नंतर मग जिरं, उदीड डाळ, लाल सुक्या मिरच्या आणि कढीपत्ता घाला.
8 / 8
कढीपत्ता हातानं व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्या. ही खमंग फोडणी चटणीवर लगेच ओता आणि हलक्या हातानं एकत्र करून घ्या.
टॅग्स : अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स