साऊथ इंडियन गाडीवर मिळतो तसा मऊ-जाळीदार डोसा घरीच करा; १० ट्रिक्स, करा परफेक्ट डोसा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 17:16 IST
1 / 10डोश्याचे पीठ बनवताना ३ भाग तांदूळ आणि १ भाग उडीदाची डाळ हे प्रमाण घ्या. तांदळाचं प्रमाण जास्त ठेवल्यास डोसा मऊ होतो.(How To Make Soft Spongy Dosa)2 / 10डाळ आणि तांदूळ भिजवताना त्यात १ चमचा मेथी दाणे नक्की घाला यामुळे आंबवण्याची प्रक्रिया चांगली होते. (Soft Spongy Dosa Making Tips)3 / 10तांदूळ भिजवताना त्यात अर्धी वाडी जाड पोहे, अर्धी वाटी शिजवलेला भात घाला.(The Secret To Soft Spongy Dosa Tips To Achive The Perfect Texture)4 / 10डाळ आणि तांदूळ मिक्सरमध्ये अगदी बारीक आणि गुळगुळीत दळून घ्या. पीठ जाड राहिल्यास जाळी पडत नाही.5 / 10पीठ आंबवण्यासाठी ते उष्ण ठिकाणी ठेवा. पीठ चांगलं फुगून दु्प्पट झालं पाहिजे.6 / 10डोस बनवण्यापूर्वी पिठात पाणी घालून त्याची जाडी इडलीच्या पिठासारखी करून घ्या. घट्ट पीठ मऊ डोसा बनवते.7 / 10डोसा मऊ व्हावा म्हणून सोडा आणि इनो घालण्याची गरज नाही. योग्य आंबवल्यास आपोआप मऊ होईल.8 / 10डोसा करताना तवा जास्त कडक गरम नसावा. मध्यम आचेवर डोसा पसरवून घ्या.9 / 10डोसा परसवल्यानंतर त्यावर तेल किंवा तूप अगदी कमीत कमी लावा जास्त लावू नका. यामुळे डोसा कुरकुरीत न होता मऊ राहतो.10 / 10पीठ तव्यावर जाडसर पसरवा. डोसा पातळ पसरवल्यास कुरकुरीत होतो.