Join us
Daily Top 2 Weekly Top 5

पोहे कधी गचके कधी खूप कोरडे होतात? ६ चुका टाळा, मऊसूत, चविष्ट होतील बटाटे पोहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 20:41 IST

1 / 7
पोहे (Poha) करण्यासाठी नेहमी जाड किंवा मध्यम पोहे वापरा. पातळ पोहे वापरल्यास पोहे गळून जातात आणि गचका होतो. पोहे जास्तवेळ पाण्यात भिजवून ठेवू नका. चाळणीत घेऊन त्यावर पाणी ओला आणि जास्तीचं पाणी निथळून घ्या. (How To Make Soft Poha For Breakfast)
2 / 7
पोहे धुवून झाल्यावर त्यात थोडी साखर, मीठ आणि लिंबू पिळून १० ते १५ मिनिटं बाजूला ठेवा यामुळे ते मऊ होतात.
3 / 7
बटाटा लवकर शिजण्यासाठी त्याचे अगदी पातळ काप करा किंवा आधी वाफवून घेऊन मग फोडणीत घाला.
4 / 7
तेलाचं प्रमाण खूप कमी असेल तर पोहे कोरडे पडतात. त्यामुळे फोडणीत तेल मध्यम पण पुरेसं घाला.कांदा पारदर्शक होईपर्यंत परतवून घ्या आणि बटाटा पूर्ण शिजल्याची खात्री करा.
5 / 7
जर पोहे कोरडे वाटत असतील तर कढईत टाकल्यावर वरून हातानं थोडा पाण्याचा हबका मारा.
6 / 7
पोहे फोडणीत मिक्स केल्यानंतर मंद आचेवर झाकण ठेवून २ ते ३ मिनिटं चांगली वाफ काढून घ्या.
7 / 7
शेंगदाणे कुरकुरीत हवे असतील तर ते सुरूवातीला तळून बाजूला काढा आणि शेवटी वरून घाला.गॅस बंद केल्यावर भरपूर कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालून पोहे सर्व्ह करा.
टॅग्स : कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स