By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 09:24 IST
1 / 7चपाती तव्यावरून काढल्यानंतर लगेच टिफिनमध्ये भरू नका. ती एका जाळीवर किंवा प्लेटमध्ये ठेवा. जेणेकरून त्यातील जास्त गरम वाफ निघून जाईल. गरम वाफेमुळे डब्याला पाणी सुटते आणि चपाती खालून ओली, वातड होते2 / 7चपाती कधीही थेट स्टिलच्या डब्यात ठेवू नका. ती नेहमी एका स्वच्छ सुती रूमालात किंवा मलमलच्या कापडात गुंडाळून ठेवा. कापड जास्तीचा ओलावा शोषून घेते आणि चपातीचा मऊपणा टिकवून ठेवते.3 / 7शक्यतो एल्युमिनियम फॉईलऐवजी बटर पेपर किंवा सुती कापडाचा वापर करा. फॉईलमध्ये चपाती जास्त वेळ राहिल्यास ती घामामुळे ओलसर आणि नंतर चिवट होऊ शकते.4 / 7चपाती रूमालात गुंडाळून डब्यात ठेवल्यानंतर डब्याचे झाकण घट्ट लावा. जर डबा एअर टाईल असेल तर बाहेरील हवा आत जात नाही आणि चपाती कोरडी पडत नाही.5 / 7जर शक्य असेल तर डब्यात चपात्या ठेवताना सर्वात खाली एक कोरिव कागद किंवा जाड टिश्यू पेपर असेल तर त्यावर कापडात गुंडाळलेली चपाती ठेवा. यामुळे खालच्या बाजूची चपाती साचलेल्या पाण्यानं भिजत नाही.6 / 7टिफिनसाठी तुम्ही फुलका करण्याऐवजी घडीची चपाती केली तर ती जास्तवेळ मऊ राहते.7 / 7याशिवाय चपाती मऊ राहण्याासाठी तुम्ही तेल किंवा तूप लावूनही टिफिनमध्ये ठेवू शकता.