1 / 6उन्हाळा आला की दही, ताक हे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जातात. पण उन्हाळ्यातच नेमकी अशी अडचण येते की खूप उष्णता असल्याने दही व्यवस्थित विरजत नाही. काही तासांतच ते खूप आंबट होऊन जातं आणि शिवाय पातळ होतं...(how to make perfect thick curd in summer at home?)2 / 6पण दही लावताना काही टिप्स आणि ट्रिक्स लक्षात ठेवल्या तर नक्कीच उन्हाळ्यातही अगदी घट्ट दही तुम्हाला लावता येईल. त्यासाठी नेमकं काय करायचं ते पाहूया...(3 tips for making thick curd at home)3 / 6बहुतांश घरांमध्ये साय काढून नंतर उरलेल्या दुधाचं दही लावलं जातं. आता अशा दुधाचं दही तुम्ही लावणार असाल तर ते दूध थोडंसं उकळवून आटवून घ्या. कारण जेवढं दाट दूध असेल तेवढं छान दही लागतं.4 / 6उकळवून आटवून घेतलेलं दही जेव्हा थोडं कोमट होईल तेव्हा साधारण पाव लीटर दूध असेल तर त्यात १ चमचा मिल्क पावडर मिसळा. मिल्क पावडरमुळे दुधाला घट्टपणा येतो आणि दही दाट होण्यास मदत होते. शिवाय दह्याला छान गोड चव येते.5 / 6किंवा तुम्ही थेट बाजारात विकत मिळणारं फुल फॅट दूध आणून त्याचंही दही लावू शकता. ते दहीदेखील अतिशय उत्तम होतं. 6 / 6तसेच दही लावण्यासाठी खूप पातळ विरझण वापरू नये. विरझणही घट्ट असावं तसेच ते खूप आंबट असू नये. या काही टिप्स लक्षात ठेवून दही लावलं तर नक्कीच खूप घट्ट आणि दाट दही लागेल.