By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 18:37 IST
1 / 8भाकरी कशीबशी थापली तर जाते पण शेकायला जावं तर भाकरी फुगत नाही अशी बऱ्याचजणांची तक्रार असते. (How to Make Perfect Bhakari)2 / 8भाकरी छान टम्म फुगावी यासाठी थोडी कसरत आणि काही खास युक्त्यांची गरज असते. भाकरी न फुगण्यामागे पीठ मळण्यापासून ते भाकरी शेकण्यापर्यंत अनेक कारणं असू शकतात. ज्वारीचं पीठ खूपच जुनं नसावं. पीठ जेवढं ताजं, तेव्हढी भाकरी छान फुगते. (How to Make Perfect Puff Bhakari)3 / 8ज्वारीची भाकरी करताना नेहमी कोमट पाणी वापरा. यामुळे पिठाला चांगली लवचिकता येते आणि भाकरी थापताना कडा चिरत नाहीत. (Make Perfect Puff Bhakari 8 Master Tips)4 / 8 पीठ चांगलं मळणं खूपच महत्वाचे आहे. पीठ नुकतं एकत्र करू नका. तर तळ हातानं दाब देऊन 4 ते 5 मिनिटं चांगलं मळा. पीठ जितकं मऊ मळाल तेव्हढीच भाकरीची जाळी चांगली पडेल.5 / 8भाकरी थापताना हाताला पाणी लावून ती थापा. पिठाची कोरडी बाजू वरच्या दिशेने ठेवा. जेणेकरून भाकरीला तडे जाणार नाहीत.6 / 8 भाकरी सर्व बाजूंनी एकसारखी थापली जावी. कुठे जाड तर कुठे पातळ असेल तर हवा धरून राहत नाही आणि भाकरी फुगत नाही.7 / 8तवा आधी मध्यम आचेवर चांगला गरम होऊ द्या. खूप थंड तव्यावर भाकरी टाकल्यास ती नीट फुगत नाही. तवा गरम झाल्यावर मगच भाकरी त्यावर घाला. गॅसवर भाकरी भाजताना सुती कापडाचा वापर करा. भाकरीच्या कडांना हलक्या हातानं दाबा. ज्यामुळे वाफ आतल्या आत फिरेल आणि भाकरी टम्म फुगेल.8 / 8 भाकरी तव्यावर घातल्यावर वरच्या बाजूला लगेच पाणी लावा. पाणी सर्व बाजूंनी एकसारखे पसरवा. पाणी सुकलं की लगेच भाकरी उलटवून घ्या. पहिली बाजू तव्यावर पूर्णपणे नीट शेकली गेली पाहिजे. जर खालची बाजू कच्ची राहीली तर भाकरी गॅसवर ठेवल्यावर फुगणार नाही.