Join us

Lunchbox Recipe : मुलांच्या डब्यात द्या 'रोटी रॅप', ४ सोपे प्रकार- चविष्ट डबा पाहून मुलंही होतील खुश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2025 18:34 IST

1 / 6
सध्या 'रॅप'चे वेगवेगळे प्रकार खूप आवडीने खाल्ले जातात. आपला नेहमीचा पोळीचा रोलच असतो तो, पण त्याला 'रॅप' असं गोड नाव देऊन चवीमध्ये थोडा जास्त चटपटीतपणा आणलेला असतो..
2 / 6
असे रॅप घरच्याघरी करणं अगदी सोपं असून तुम्ही आपल्या नेहमीच्या पोळ्या वापरूनच मुलांना डब्यात वेगवेगळ्या प्रकारचे रॅप करून देऊ शकता.. बघा ते नेमके कोणते.(how to make roti wrap at home?)
3 / 6
पनीर रॅप हा प्रकार सगळ्यांना खूप आवडतो. पनीरमध्ये प्रोटीन्सही भरपूर असतात. त्यामुळे पनीर आणि काही भाज्या एकत्र फ्राय करा. त्यात वेगवेगळे मसाले घाला आणि मुलांना झटपट पनीर रॅप करून द्या..(how to make different types of roti wraps for kids tiffin?)
4 / 6
व्हेज रॅप हा प्रकारही तुम्ही करू शकता. यासाठी कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, पत्ताकोबी, फुलकोबी अशा वेगवेगळ्या भाज्या तेलात परतून घ्या. त्यामध्ये वेगवेगळे सॉस घाला आणि ही भाजी पोळीमध्ये भरून मुलांना व्हेज रॅप करून द्या.
5 / 6
सध्या स्वीटकॉर्न बाजारात भरपूर प्रमाणात मिळत आहेत. ते मुलांना आवडतात. त्यामुळे त्यांचा स्वीटकॉर्न रॅप करून दिला तरी मुलं आवडीने खातील.
6 / 6
वटाणे, राजमा, हरबरे, चवळी अशी कडधान्ये भिजत घालून उकडून घ्या. त्यामध्ये वेगवेगळे सॉस आणि मसाले घालून ते खमंग परतनू घ्या. या कडधान्यांचाही अतिशय पौष्टिक रोटी रॅप तयार होईल. एरवी कडधान्यं ताटातही न घेणारे मुलं हा रॅप मात्र आवडीने खातील.
टॅग्स : अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृतीलहान मुलं