Join us

दुधाला घट्ट भाकरीसारखी साय येईल; दूध तापवण्याच्या ७ टिप्स, भरपूर जाडसर साय दुधाला येईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 20:37 IST

1 / 7
दूध उकळवण्यासाठी किंवा थंड करण्यासाठी शक्य असल्यास रूंद किंवा उथळ भाडं वापरा. रुंद तोंड असलेल्या भांड्यात दुधात पृष्ठभाग मोठा असतो. ज्यामुळे जाय व्यवस्थित मोठी येते. (How To Get Thick Malai On Milk)
2 / 7
काही लोक दूध उकळवल्यानंतर ते मातीच्या भांड्यात ठेवण्याचा सल्ला देतात. मातीच्या भांड्यात दूध ठेवल्यानं साय अधिकच घट्ट आणि जाड होते. (How To Make More Malai From Milk)
3 / 7
एकदा साईचा थर तयार झाल्यानंतर तो काढण्यापूर्वी दूध पुन्हा गरम करू नका. कराण साय काढण्यापूर्वी जर तु्म्ही दूध गरम केले तर ती साय वितळवून दुधात मिसळून जाईल.
4 / 7
दूध उकळत असताना किंवा थंड झाल्यावर ढवळू नका. दूध स्थिर ठेवल्यास फॅटचे कण पृष्ठभागावर व्यवस्थित जमा होतात आणि साय तुटत नाही.
5 / 7
साय काढण्याची घाई करू नका. किमान ८ ते १२ तास तसंच ठेवा. ज्यामुळे साय घट्ट होते.
6 / 7
साय काढताना ती भांड्याच्या कडांपासून हळूवारपणे सैल करा आणि चमच्यानं अलगद काढून घ्या. साय फाटणार नाही याची काळजी घ्या.
7 / 7
साय काढताना ती भांड्याच्या कडांपासून हळूवारपणे सैल करा आणि चमच्याने किंवा पळीनं अलगद काढून घ्या. जमा केलेली साय नेहमी एका स्वच्छ आणि हवाबंद डब्यातच फ्रिजमध्ये साठवा.
टॅग्स : अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स