हॉटेलमध्ये मिळतो तसा कुरकुरीत मसाला डोसा करण्याच्या ७ ट्रिक्स; घरीच करा परफेक्ट डोसा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 14:48 IST
1 / 7विकत मिळतो तसा कुरकुरीत मसाला डोसा करण्यासाठी काही सोप्या टिप्स लक्षात ठेवायला हव्यात तांदूळ आणि उडीद डाळ याचं प्रमाण योग्य ठेवा. ३ भाग तांदूळ असल्यास १ भाग उडीद डाळ घ्या. मेथी दाणे आणि पाव वाटी शिजवलेला भात किंवा पोहे वापरा.2 / 7तांदूळ आणि डाळ किमान ६ तास वेगवेगळं किंवा एकत्र भिजवा. पाणी कमी वापरून पीठ मऊ आणि जाडसर वाटून घ्या. पीठ, मीठ न घालता ८ ते १२ तास एखाद्या गरम ठिकाणी फुगण्यासाठी ठेवा.3 / 7डोसा करताना पीठ पातळ असावं. डोसा पसरवण्यापूर्वी तवा जास्त गरम करून त्यावर पाणी शिंपडा आणि पुसून घ्या. तव्याची आच मंद करून वाटीनं पीठाचा एक थेंब घालून मध्यभागी सुरूवात करून बाहेरच्या बाजूला पीठ पसरवा.4 / 7डोसा पसरवल्यावर आच मध्यम करा. कडांना आणि मध्यभागी तूप किंवा तेल सोडा आणि सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. डोसा कुरकुरीत होण्यासाठी लोखंडी तवा किंवा नॉन स्टिक तव्याचा वापर करा. लोखंडी तवा जास्त चांगला असतो पण तो आधी सिझन केलेला असावा.5 / 7पीठ आंबवल्यानंतर त्यात थोडं मीठ आणि १ छोटा चमचा साखर घाला. साखर डोश्याला लवकर सोनेरी रंग देते आणि कुरकुरीतपणा वाढवते.पीठ आंबवल्यावर ते जास्त मिक्स करू नका. फक्त आवश्यक असल्यास पाणी घालून हलक्या हातानं मिसळा. जास्त ढवळल्यास पिठातील हवा निघून जाते. ज्यामुळे डोसा मऊ होऊ शकतो.6 / 7भाजीसाठी बटाटे एकदम लगदा न करता हलके मॅश करून घ्या किंवा त्याचे मोठे तुकडे ठेवा. यामुळे भाजीला रेस्टॉरंटसारखे टेक्स्चर मिळते. फोडणीत उडीद डाळ आणि मोहोरी वापरा. उडीद डाळ सोनेरी झाल्यावर ती भाजीला क्रंच देते. कांदा जास्त भाजण्याऐवजी तो पारदर्शक होईपर्यंतच परतवून घ्या. कांदा थोडा क्रंची राहिल्यास भाजीची चव वाढते.7 / 7जर तुम्हाला डोसा एकदम पांढरा आणि अधिक कुरकुरीत हवा असेल तर तो डाळ भिजवताना वापरलेलं पाणी फेकून न देता तेच पाणी पीठ वाटताना वापरा. डोसा तव्यावर पसरवल्यावर सुरूवातीला कडांन तेल किंवा तूप सोडा. यामुळे डोसा काढणं सोपं होतं आणि मधोमध कुरकुरीत होतो.