कोथिंबीर वडी खमंग खुसखुशीत होण्यासाठी ८ टिप्स, वड्या कमी तेलकट होतील-५ दिवस टिकतील
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 17:38 IST
1 / 8कोथिंबीर वडी परफेक्ट होण्यासाठी कोथिंबीर धुतल्यानंतर ती पूर्णपणे कोरडी करपून मगच चिरा. कोथिंबीर ओली असल्यास पीठ चिकट होतं आणि वडी मऊ पडते. (How To Make kothimbir Vadi)2 / 8केवळ बेसन न वापरता त्यात थोडं तांदळाचं पीठ मिसळा. यामुळे वडीला छान कुरकुरीतपणा येतो. (Kothimbir Vadi Recipe)3 / 8कोथिंबीरीला पाणी सुटते. त्यामुळे पीठ मळताना पाण्याचा वापर अत्यंत कमी किंवा गरज असेल तरच करा.4 / 8पीठ मळताना त्यात २ ते ३ चमचे कडकडीत गरम तेलाचे मोहन घाला. यामुळे वडी खुसखुशीत होते.5 / 8पिठात आलं, लसूण मिरचीची पेस्ट, तीळ आणि थोडा ओवा चोळून घालावा. यामुळे वडीला छान खमंग चव येते.6 / 8वड्यांचे रोल वाफवताना मध्यम आचेवर १५ ते २० मिनिटं वाफवावेत. जास्त वेळ वाफवल्यास वड्या चिवट होऊ शकतात.7 / 8 वाफवलेले रोल पूर्णपणे थंड झाल्याशिवाय कापू नयेत. गरम असतानाच कापल्यास वड्यांचा आकार बिघडतो आणि त्या तुटतात.8 / 8वड्या तळताना तेल चांगलं गरम करा. मध्यम ते उच्च आचेवर तळल्यास वड्या तेलकट होत नाहीत आणि बाहेरून कुरकुरीत राहतात. पिठात खायचा सोडा वापरणं टाळा. कारण सोड्यामुळे वड्या जास्त तेल शोषून घेतात.