By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 20:06 IST
1 / 8दही आणि बेसन एकत्र करताना ते आधी व्यवस्थित फेटून घ्या. जेणेकरून त्यात गुठळ्या राहणार नाहीत. साधारण 1 वाटी दह्यासाठी 1 ते दीड चमचा बेसन पुरेसे असते. (How To Make Kadhi At Home)2 / 8कढी करण्यासाठी फ्रिजमधील थंड दही थेट वापरू नका. दही कोमट किंवा रूम टेम्परेचरवरचं असावं.3 / 8कढी गॅसवर ठेवल्यापासून त्याला पहिली उकळी येईपर्यंत पळीनं एकाच दिशेनं सतत ढवळत राहा. यामुळे दही फुटत नाही.4 / 8कढी शिजवताना सुरूवातीला मीठ घालू नका. कढीला चांगली उकळी आल्यानंतर किंवा गॅस बंद करण्यापूर्वी मीठ घातल्यास कढी फुटण्याची शक्यता कमी असते.5 / 8कढी नेहमी मध्यम किंवा मंद आचेवर शिजवावी. मोठ्या आचेवर दही लवकर फाटू शकते.6 / 8कढी जास्त घट्ट वाटत असल्यास त्यात गरम पाणी न घालता साधं पाणी घालून व्यवस्थित घुसळून मगच गॅसवर ठेवा. या टिप्स वापरल्यास कढी हॉटेलसारखी परफेक्ट होईल आणि चवीला उत्तम लागेल.7 / 8कढी जास्त जास्त घट्ट वाटत असेल त्यात गरम पाणी न घालता साधे पाणी घालून व्यवस्थित घुसळून मगच गॅसवर ठेवा.8 / 8कढीची चव दुप्पट करण्यासाठी फोडणीसाठी थोडं आलं आणि लसणाची पेस्ट ठेचून परतवून घ्या. यामुळे एक छान खमंग वास येतो.