Join us

ज्वारीची भाकरी थापताना तुटते- फुगत नाही, कडक होते? १० टिप्स, मऊ होईल-टम्म फुगेल भाकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 12:24 IST

1 / 10
ज्वारीची भाकरी परफेफ्ट होण्यासाठी काही टिप्स पाहूया (How To Make Jawar Roti Soft). ज्वारीच्या पिठाची भाकरी करण्यासाठी कोमट किंवा हलकं गरम पाणी घ्या. थंड पाण्यामुळे भाकरी तुटण्याची शक्यता असते. (Jwarichi Bhakri Recipe)
2 / 10
पिठाचा गोळा तयार झाल्यावर त्याला तळ हाताच्या मागच्या बाजूनं चांगले मऊ मळा. ज्वारीच्या पिठाला व्यवस्थित टेक्स्चर येण्यासाठी हे महत्वाचे असते.
3 / 10
ज्वारीची भाकरी करताना पाणी एकदम न घालता थोडं, थोडं घेऊन मळा. पीळ जास्त पातळ किंवा जास्त घट्ट होऊ देऊ नका.
4 / 10
भाकरीसाठी नेहमी ताजे दळलेलेच पीठ वापरा. जुने पीठ वापरल्यास भाकरी तुटते.
5 / 10
भाकरी करायच्या ऐनवेळीच आणि एकावेळी फक्त एकाच भाकरीसाठी लागणारं पीठ मळा.
6 / 10
भाकरी थापताना पॅकिंगसाठी कोरड्या पिठाचा वापर शक्यतो कमी करा.
7 / 10
लोखंडी तवा चांगला कडक गरम करून घ्या. कमी गरम तव्यावर भाकरी तुटू शकते.
8 / 10
भाकरी तव्यावर टाकल्यानंतर लगेच तिच्या पृष्ठभागावर ओल्या हातानं पाणी लावा.
9 / 10
लावलेलं पाणी पूर्णपणे सुकल्यावर आणि भाकरीच्या कडा वर येऊ लागल्यावर ती पलटून दुसरी बाजू भाजा.
10 / 10
दुसरी बाजू भाजून झाल्यावर थेट गॅसच्या आचेवर फिरवून भाकरी व्यवस्थित फुगवा.
टॅग्स : अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स