हॉटेलसारखा कुरकुरीत डोसा घरीच करा; १० ट्रिक्स-डोश्याचं पीठ छान फुलेल, डोसा परफेक्ट होईल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 13:28 IST
1 / 10डोसा कुरकुरीत होण्यासाठी डोश्याचं पीठ पातळ असावं. इडलीच्या पिठासारखं जाड नसावं. ते तव्यावर सहज परसवलं गेलं पाहिजे. (How To Make Dosa More Crispy)2 / 10पीठ चमच्यातून ओतल्यावर ते वेगानं आणि पातळ धारेनं खाली पडायला हवं. जाडसर थेंब नाही. (Crispy Dosa Making Tips)3 / 10जास्त पातळ झाल्यास डोसा तुटू शकतो. आवश्यकतेनुसार त्यात थोडं थोडं पाणी मिसळा. (Cooking Hacks)4 / 10पीठ व्यवस्थित आंबवलेलं असावं. यामुळे पिठात हवा राहत नाही. ज्यामुळे डोसा जाळीदार आणि कुरकुरीत होतो.5 / 10डोसा आंबवण्यासाठी उष्ण आणि ओलसर जागा निवडावी.6 / 10डोश्याच्या तांदूळ आणि डाळीमध्ये भिजवलेले किंवा बारीक केलेले पोहे मिसळ्यास डोसा अधिक कुरकुरीत होतो.7 / 10 साधारणपणे 4 भाग तांदूळ आणि 2 भाग उडीद डाळ हे प्रमाण कुरकुरीत डोश्यासाठी उत्तम ठरतं.8 / 10 डोसा करण्याच्या वेळीच मीठ घाला. आंबवण्यापूर्वी नाही.9 / 10प्रत्येक डोसा तव्यावर घालण्यापूर्वी बॅटर खालपासून व्यवस्थित ढवळून घ्या कारण तांदळाचे कण खाली बसतात.10 / 10कुरकुरीत डोश्यासाठी पिठाच्या जाडीसोबतच तव्याचे तापमान योग्य असणंही महत्वाचं आहे. तवा चांगला तापलेला असावा.