Join us

पीठ तव्याला चिकटतं-डोसा नीट होत नाही? ७ चुका टाळा, विकतसारखा कुरकुरीत-गोल डोसा करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 19:08 IST

1 / 8
उत्तम डोसा (Dosa) बनवणं ही एक कला आहे पण डोसा तव्याला चिकटतो, कुरकुरीत होत नाही अशा अडचणी येणं खूपच सामान्य आहे. काही सोप्या टिप्स वापरल्या तर तुम्ही हॉटेलसारखा कुरकुरीत, परफेक्ट गोलाकार डोसा घरी बनवू शकता. (How To Make Hotel style Crispy Dosa At Home)
2 / 8
डोश्याचं पीठ खूप घट्ट किंवा पातळ असू नये. डोसा करताना तव्यावर तेलाचा किंवा पाण्याचा थेंब राहिल्यास डोसा चिकटतो.
3 / 8
नॉन स्टिक तव्यावर डोसा करणं सोपं असतं पण डोसा करण्यापूर्वी तेलानं हलकं कोटिंग करून घ्या. जास्त तेल घालू नका.
4 / 8
डोसा घालण्यापूर्वी गॅसची आच मंद ठेवा. डोसा घातल्यानंतर आच मध्यम ठेवून मग शिजवा. यामुळे डोसा आतून-बाहेरून सारखाच शिजेल.
5 / 8
तवा खूप गरम किंवा थंड असेल तर डोसा चिकटू शकतो म्हणून डोश्याचं प्रमाण योग्य असायला हवं.
6 / 8
डोसा करण्याआधी गरम तव्यावर पाण्याचे थेंब शिंपडा. पाण्याची वाफ झाली की समजा तवा डोसा घालण्यासाठी तयार आहे.
7 / 8
डोश्याचं पीठ तुम्ही फ्रिजमध्ये ठेवलं असेल तर ते आधी रूम टेम्परेचरवर आणा नंतर डोसा करायला घ्या.
8 / 8
डोसा एका बाजूनं व्यवस्थित कुरकुरीत झाल्यानंतरच पलटा. लवकर पलटी केला तर मऊ राहतो डोश्याला सोनेरी रंगही येत नाही.
टॅग्स : अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स