By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 16:42 IST
1 / 8जमा केलेल्या सायीपासून तूप काढण्यासाठी शक्यतो थोड्या मोठ्या तोंडाचे आणि जाड तळाचे स्टिलचे पातेले घ्या. ज्यामध्ये साय सहज मावेल.जमा केलेली साय थोडी बाहेर काढून ठेवा. जेणेकरून ती खूपच घट्ट राहणार नाही. (How To Make Ghee At Home)2 / 8पातेल्यातील सायीवर स्टीलचा ग्लास उपडा ठेवा. त्यानंतर तो ग्लास हातानं गोल-गोल फिरवत सायीवर दाबानं घासा. (How To Make Ghee At Home Without Using Mixer Or Blender)3 / 8 सततच्या घर्षणामुळे सायीचे गोळे तयार होऊ लागतात आणि त्यातील पाणी वेगळे होऊन लोणी वर येऊ लागते.4 / 8हे करताना थोडा वेळ लागतो पण मिक्सरचा वापर न करता हातानं केल्यामुळे लोण्याला एक वेगळीच चव येते आणि त्याचा दर्जाही उत्तम राहतो.5 / 8एकदा सायीतून पांढरेशुभ्र लोणी बाहेर आले की हातानं गोळा करून घ्या आणि नेहमीप्रमाणे मंद आचेवर गरमकरून तूप तयार करून घ्या. ही पद्धत थोडी कष्ट करणारी असेल तरी लोणी एकदम मऊ आणि दाणेदार निघते.6 / 8ही पद्धत वापरताना शक्यतो धारदार कडा नसलेला आणि जड तळाचा स्टीलचा ग्लास वापरा. यामुळे हाताला इजा होत नाही आणि सायीवर पुरेसा दाब निर्माण होतो.7 / 8साय घासताना ती खूपच जास्त घट्ट वाटली तर त्यात अगदी थोडे थंड पाणी किंवा कोमट पाणी घाला. यामुळे लोणी लवकर सुट्टे होण्यास मदत होते.8 / 8 ग्लास फिरवताना तो फक्त गोल न फिरवता ८ च्या आकारात किंवा घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं एकाच लयीत घासा. यामुळे सायीतील फॅट्स लवकर एकत्र येतात. मिक्सरमध्ये साय फिरवल्यास कधीकधी मिक्सरच्या उष्णतेनं लोण्याला उग्र वास येतो. मात्र ग्लासानं साय घासल्यामुळे ती थंड राहते आणि लोण्याचा सुगंध नैसर्गिकरित्या टिकून राहतो.