By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 17:09 IST
1 / 8हिवाळ्यामध्ये डोश्याचे पीठ (Dosa Batter) न फुलण्याची समस्या अनेकजणांना येते आणि त्यामुळे डोसा कुरकुरीत होण्यासाठी पीठ दळताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. (How To Make Dosa Crispy)2 / 8तांदूळ आणि उडीद डाळीचे प्रमाण योग्य ठेवा. ३ वाटी तांदूळ आणि १ वाटी उडीद डाळ घ्या. काहीजण कुरकुरीतपणा वाढवण्यासाठी थोडे जास्त तांदूळ घेतात. (Easy Ways To Make Dosa Crispy)3 / 8१ वाटी उडीद डाळीसाठी दीड चमचा मेथी दाणे वापरा. यामुळे फर्मेंटेशन प्रक्रिया वेगानं होण्यास मदत होते.4 / 8हिवाळ्यात पीठ फुगण्यासाठी उष्ण आणि सुरक्षित जागा निवडा. काहीजण गरम पाण्याची बाटली किंवा थर्मल पॅड शेजारी पीठ ठेवतात.5 / 8थंडीमध्ये पीठ फुगवण्यासाठी १८ ते २४ तास लागू शकतात गरम ठिकाणी ठेवल्यास थोडा कमी वेळ लागू शकतो. 6 / 8पीठ वाटताना दीड वाटी शिजवलेला भात किंवा पोहे वापरल्यास डोसा अधिक कुरकुरीत होते आणि त्याला रंगही छान येतो.7 / 8पीठ तयार झाल्यावर डोसा करण्यापूर्वी १ ते २ चमचे बारीक रवा किंवा मैदा मिसळल्यास डोशाला क्रिस्पीनेस येतो.8 / 8तव्याचे तापमान योग्य असावे. डोसा घालण्यापूर्वी तापमान थोडे कमी करण्यासाठी तव्यावर पाण्याचे काही थेंब शिंपडा आणि लगेच कापडानं पुसून घ्या.