By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 17:32 IST
1 / 9प्रेशर कुकरमध्ये डाळ करताना कधी खूपच जास्त शिजते तर कधी कच्ची राहते. अनेकदा भरपूर मसाले घालूनही डाळीला व्यवस्थित चव येत नाही. परफेक्ट डाळ बनवण्यासाठी तुम्ही काही सोप्या ट्रिक्स वापरू शकता. (Easy Way To Make Dal In Cooker)2 / 9डाळ शिजवण्यापूर्वी किमान १५ ते २० मिनिटं कोमट पाण्यात भिजत ठेवा. यामुळे डाळ लवकर शिजते आणि पचायला हलकी होते.3 / 9सामान्यत: १ वाटी डाळीसाठी २.५ ते ३ वाट्या पाणी वापरा. डाळ जास्त घट्ट हवी असेल तर पाण्याचे प्रमाण थोडं कमी ठेवा.4 / 9पाणी उकळल्यानंतर डाळीवर जो पांढरा फेस येतो तो काढून टाकल्यास युरिक एसिडचा त्रास होत नाही आणि डाळ चविष्ट लागते.5 / 9डाळ शिजवताना त्यात चिमूटभर हळद किंवा एक छोटा चमचा तेल किंवा तूप घाला. यामुळे डाळीला छान रंग येतो आणि कुकरच्या शिट्टीवाटे पाणी बाहेर येत नाही.6 / 9डाळ शिजवताना त्यात थोडा हिंग घातल्याचा त्याचा सुगंध डाळीमध्ये छान उतरतो आणि गॅसचा त्रासही होत नाही.7 / 9सुरूवातीला एक शिट्टी मोठ्या आचेवर करा त्यानंतर गॅस बारीक करून ५ ते ६ मिनिटं शिजू द्या. यामुळे डाळ मॅश न होता व्यवस्थित शिजते.8 / 9कुकरची शिट्टी झाल्यावर लगेच तो पूर्णपणे उघडू नका. कुकर स्वत:हून थंड होऊ द्या. जेणेकरून वाफेवरची डाळ आतून पूर्णपणे शिजेल.9 / 9जर शिजलेली डाळ खूप घट्ट वाटत असेल तर त्याच नेहमी गरम पाणीच घाला. गार पाण्यामुळे डाळीची चव बिघडते. डाळ शिजवतानाच त्यात एखादा चिरलेला टोमॅटो आणि ठेचलेले आलं-लसूण घातल्यास डाळीची चव दुप्पटीनं वाढते.