1 / 8पावसाळ्यात घरच्याघरीच दही तयार कारणं मोठं अवघड आणि किचकट (How To Make Curd In Rainy Season Perfectly Avoid These Common Mistakes) काम वाटत. या ऋतूंत हवामान दमट आणि थंड असतं, त्यामुळे दही व्यवस्थित लागणं कठीण जातं किंवा त्याचे टेक्श्चर बिघडते. इतकंच नाही तर काहीवेळा दही चुकून लागलंच तर, कधी ते पातळ, आंबट किंवा पाणचट होत. अशा परिस्थितीत, काही सोप्या आणि उपयोगी टिप्स लक्षात ठेवल्यास घरच्याघरीच विकतसारखे, घट्ट आणि चविष्ट दही तयार करणं सहज शक्य होतं( How to set perfect curd at home during monsoon).2 / 8पावसाळ्यात घरच्याघरीच दही लावताना ते बिघडू नये तसेच, विकतसारखे दाटसर, घट्ट दही तयार करण्यासाठी काही सोप्या टिप्स लक्षात ठेवूयात. 3 / 8दही लावताना दुधाचं तापमान खूप महत्त्वाचं असतं. जर दूध खूप थंड असेल तर दही लागायला जास्त वेळ लागतो किंवा काहीवेळा दही लागतच नाही. तसेच दूध खूप गरम असेल तर दही आंबट आणि खराब होण्याची शक्यता असते. यासाठीच, पावसाळ्यात दही लावताना दूध हलकंसं कोमट करूनच वापरावं, जेणेकरून दही व्यवस्थित आणि घट्ट व दाटसर लागेल.4 / 8विकतसारखे घट्ट व दाटसर दही घरच्याघरीच लावण्यासाठी योग्य प्रमाणात विरजण वापरणं अत्यंत गरजेचं असत. जर विरजण कमी असेल तर दही लागायला जास्त वेळ लागतो आणि दही नीट लागत नाही. याचबरोबर, जास्त विरजण लावल्यास लावल्यास दही आंबट होण्याची शक्यता असते आणि चव देखील बिघडते. सामान्यतः १ लिटर दुधासाठी १ ते २ चमचे विरजण पुरेसं असतं. त्यामुळे दही लावताना विरजणाचे प्रमाण अचूक ठेवा.5 / 8दही लावण्यासाठी वापरलेलं भांडं स्वच्छ आणि कोरडं असणं खूप महत्त्वाचं आहे. ओलसर किंवा अस्वच्छ भांड्यात दही व्यवस्थित लागत नाही आणि त्याचे टेक्शचरही बिघडते. त्यामुळे भांडं धुतल्यानंतर ते व्यवस्थित पुसून कोरडं करावं आणि मगच त्यात दूध ओतावं. या एका खास उपायामुळेच दही घट्ट आणि दाटसर लागतं. याचबरोबर दही लावण्यासाठी नेहमी काच, चिनीमाती, स्टील किंवा मातीच्या भांडयाचा वापर करावा. चुकूनही प्लॅस्टिकच्या भांड्यात दही लावू नये. 6 / 8 पावसाळ्यात तापमान कमी आणि हवेत ओलावा जास्त असतो, त्यामुळे दही लागणं कठीण जातं. त्यामुळे दही लावताना भांडं अशा ठिकाणी ठेवा जिथे तापमान थोडं उष्ण आणि स्थिर असेल. किचनमधील एखादा कोपरा किंवा जिथे थोडं गरम वातावरण असतं अशा जागी दही ठेवल्यास ते व्यवस्थित लागण्याची शक्यता अधिक असते. 7 / 8 दही लावताना विरजण दुधात चांगल्या प्रकारे मिसळणं आवश्यक आहे. जर विरजण दुधात नीट मिसळल नाही तर दही दाटसर आणि घट्ट लागत नाही. विरजण टाकल्यानंतर चमच्याने ते दुधात व्यवस्थित मिसळा, जेणेकरून विरजण सगळ्या दुधात व्यवस्थित पसरलं जाईल. याशिवाय, भांड्याच्या आतल्या कडेवरही थोडं विरजण लावायला विसरू नका, त्यामुळे दही नीट लागण्यास मदत होते.8 / 8या अशा छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात घेऊन दही लावलंत, तर पावसाळ्यातही घरच्या घरी स्वादिष्ट, घट्ट आणि परफेक्ट दही सहज तयार करता येईल.