गाडीवर मिळते तशी कुरकुरीत कांदाभजी घरीच करा; पिठात १ पदार्थ घाला, कमी तेलकट होईल भजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 09:35 IST
1 / 8पावसाळा असो किंवा कोणताही ऋतू कांदा भजी प्रत्येकालाच खायला आवडते. कांदा भजी चहाबरोबर, पावासोबत किंवा चपातीसोबत किंवा फक्त तळलेल्या मिरचीसोबतही खायला चवदार, चविष्ट लागते. कांदा भजी करण्याच्या सोप्या ट्रिक्स पाहू. (How to Make Perfect kanda Bhaji)2 / 8 घरी केलेली कांदा भजी मऊ पडते. कुरकुरीत होत नाही त्यात बेसन पीठ जास्त पडतं अशी बऱ्याच जणांची तक्रार असते. परफेक्ट कांदा भजी करण्यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता. (How To Make Crispy Kanda Bhaji At Home)3 / 8कांदा भजीसाठी कांदा जितका लांब किंवा पातळ चिराल तेव्हढीच भजी सुंदर लागेल. बारीक चिरलेला कांदा लवकर तळला जातो आणि कुरकुरीत लागतो.4 / 8कांद्याच्या भजीसाठी चुकूनही पाण्याचा वापर करू नका. कारण कांद्याला मीठ लावू ठेवल्यानंतर पाणी सुटतं. तेच पाणी पिठात कालवून मग भजी करा.5 / 8बाहेरच्या गाड्यांवर मिळते तशी कांदाभजी करण्यासाठी भजी धणे आणि ओवा घालायला विसरू नका.6 / 8भजीच्या पिठात १ ते २ चमचे तांदळाचा पीठ घाला.तांदळाच्या पिठातील स्टार्च भजीला कुरकुरीतपणा येतो.7 / 8पीठ कालवताना त्यात २ चमचे तेलाचे मोहन घाला. यामुळे भजी खमंग होतात.8 / 8भजी तळण्यासाठी तेल खूप थंड किंवा गरम नसावे. तेल मध्यम आचेवर गरम करून भजी तळा.