Join us
Daily Top 2 Weekly Top 5

इडलीवाल्या अण्णाकडे मिळते तशी नारळाची चटणी घरीच करा; चविष्ट होईल चटणी-सोपी रेसिपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 20:15 IST

1 / 8
हॉटेलसारखी चविष्ट आणि पांढरीशुभ्र नारळाची चटणी करण्यासाठी तुम्हाला सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. (How To Make Coconut Chutney Indian Style)
2 / 8
१ वाटी ओल्या नारळाचे काप, २ ते ३ चमचे फुटाण्याची डाळ, २ हिरव्या मिरच्या आणि थोडा आल्याचा तुकडा. (How To Make Coconut Chutney At Home)
3 / 8
मिक्सरच्या भांड्यात नारळ, डाळवं, मिरच्या, आलं आणि चवीनुसार मीठ एकत्र करून घ्या. गरजेनुसार थोडं पाणी घालून मिश्रण मध्यम सरसरीत होईपर्यंत व्यवस्थित वाटून घ्या.
4 / 8
एका लहान कढईत १ मोठा चमचा तेल गरम करायला ठेवा.तेलात मोहोरी, जिरं, १ सुकी लाल मिरची आणि भरपूर कढीपत्ता घालून तडतडू द्या.
5 / 8
फोडणीत चिमूटभर हिंग घातल्यानं हॉटेलसारखा छान सुवास येतो. ही गरम फोडणी तयार केलेल्या चटणीवर ओता आणि लगेच झाकून ठेवा.
6 / 8
ही चटणी तुम्ही गरमागरम इडली, डोसा किंवा मेदू वड्यासोबत खाऊ शकता. चटणी पांढरीशुभ्र हवी असेल तर नारळाचा मागचा काळा भाग काढून टाका आणि त्यात कोथिंबीर घालू नका.
7 / 8
चटणी वाटताना त्यात १ ते २ चमचे ताजं दही किंवा थोडा लिंबाचा रस घाला. यामुळे चटणीला हलका आंबटपणा येतो आणि तिचा पांढरा रंग टिकून राहण्यास मदत होते.
8 / 8
चटणी वाटताना नेहमी साधं किंवा थंड पाणी घाला. गरम पाणी वापरल्यानं नारळातून तेल सुटतं. ज्यामुळे चटणीची चव बदलते तसंच चटणी जास्त पातळ न करता मध्यम घट्ट ठेवा.
टॅग्स : कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स