Join us
Daily Top 2 Weekly Top 5

हिरव्यागार पुदिन्याची चटणी काळी पडते? ५ टिप्स- चटणीचा रंग राहिल फ्रेश- चवही बदलणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2026 20:00 IST

1 / 8
उन्हाळ्यात जेवणाची चव वाढवण्यासाठी पुदिन्याची चटणी हा उत्तम पर्याय आहे. समोसा, भजी किंवा साध्या वरण-भातासोबत पुदिन्याची चटणी जेवणाची चव दुप्पट करते. पण बरेचदा चटणी वाटल्यानंतर काही वेळातच तिचा हिरवा रंग बदलून काळा पडतो. फ्रिजमध्ये ठेवली तरी तिचा फ्रेशनेस टिकत नाही. चटणीचा रंग बदलला तरी ती दिसायला तर नकोशी वाटतेच, पण कधीकधी चवीतही कडवटपणा येतो. (Best way to store pudina chutney)
2 / 8
अनेकांना असं वाटतं चटणीत लिंबू पिळल्याने रंग येतो पण इतकं करणं पुरेसं नाही. चटणी काळी पडण्यामागे अनेक कारणे आहेत. हॉटेलमध्ये मिळणारी चटणी मात्र तासनतास अगदी तशीच हिरवीगार आणि चविष्ट दिसते.(Mint chutney recipe with curd or ice)
3 / 8
काही खास किचन ट्रिक्स लक्षात ठेवल्या तर पुदिना चटणी आठवडाभर फ्रेश आणि रेस्टॉरंटसारखी हिरवीगार राहिल. चटणी वाटताना कोणत्या ३ गोष्टींची काळजी घ्यायला हवी पाहूया.
4 / 8
चटणी वाटताना मिक्सरचं भांडं आणि ब्लेड फिरताना उष्णता निर्माण होते. या उष्णतेमुळे पुदिन्याची पानं काळी पडतात. चटणी वाटताना त्यात पाणी वापरण्याऐवजी २ ते ३ बर्फाचे खडे घाला. यामुळे मिक्सरमधील तापमान कमी राहतं. यामुळे चटणीचा नैसर्गिक हिरवा रंग शेवटपर्यंत तसाच राहतो.
5 / 8
हॉटेलमध्ये मिळणाऱ्या चटणीचा रंग फिकट हिरवा आणि फ्रेश असतो, कारण त्यात दही वापरलं जातं. चटणी वाटताना त्यात १ ते २ चमचे घट्ट दही घातल्यास ऑक्सिडेशनची प्रक्रिया कमी होते. यामुळे चटणी आठवड्याभरापेक्षा जास्त हिरवी राहते.
6 / 8
चटणी वाटून झाल्यानंतर त्याच अर्धा चमचा लिंबाचा रस आणि साखर मिक्स करा. लिंबू नैसर्गिक प्रिजर्वेटिव्ह म्हणून काम करते. तर साखर रंग टिकवून ठेवण्यास मदत करते. लिंबाचा रस चटणी वाटून झाल्यावर शेवटी मिक्स केल्यास जास्त चांगली राहते.
7 / 8
पुदिन्यासोबत थोडी कोथिंबीर वापरताना कोथिंबिरीच्या कोवळ्या काड्याही वापरा. यामुळे चटणीला दाटपणा येतो आणि चव अधिक वाढते.
8 / 8
चटणी दीर्घकाळ टिकवण्यासाठी काचेच्या बरणीचा वापर करा. स्टील किंवा प्लास्टिकच्या डब्यात ठेवल्यास तिची चव बदलते. ज्यामुळे ती लगेच खराब होते.
टॅग्स : अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स