Join us

How to keep banana fresh : पिकलेली केळी लवकर खराब होऊ नयेत म्हणून ५ ट्रिक्स; आठवडाभर चांगली राहतील केळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 14:16 IST

1 / 6
आपल्यापैकी क्वचितच असं कोणी असेल ज्यांच्या घरी केळी खाल्ली जात नाहीत. हे अत्यंत स्वस्त आणि सामान्य फळ असण्यासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. पण ते सडण्यापासून कसे वाचवायचे हा एक मोठा प्रश्न आहे. तुम्हाला अशाच 5 युक्त्या सांगणार आहोत ज्यामुळे केळी जवळपास आठवडाभर ताजी राहतील. (How to keep banana fresh for long week rotten kitchen hack plastic hanger vitamin c tablet fridge wax paper)
2 / 6
केळी सडण्यापासून वाचवण्यासाठी बाजारातून त्याचे हँगर्स विकत घ्या आणि त्यावर केळी टांगून ठेवा. अशाप्रकारे ठेवल्याने तुम्ही खूप दिवसांनी केळी खाऊ शकाल.
3 / 6
सामान्यतः आपण फ्रिजचा वापर खाद्यपदार्थ ताजे ठेवण्यासाठी करतो, पण केळीच्या बाबतीत असे अजिबात करू नका, तर ते सामान्य रूम टेम्परेचरवर ठेवा.
4 / 6
त्वचेला वॅक्स करण्यासाठी आपण अनेकदा वॅक्स पेपर वापरतो, पण केळी ताजे ठेवण्यासाठीही आपण या पेपरचा वापर करू शकतो. यासाठी केळी गुंडाळून किंवा वॅक्स पेपरने झाकून ठेवा.
5 / 6
केळीला जास्त काळ कुजण्यापासून वाचवायचे असेल तर त्याच्या देठावर प्लास्टिक किंवा सेलो टेप गुंडाळा, याने तुम्ही केळी जास्त काळ ताजे ठेवू शकाल.
6 / 6
केळी ताजे ठेवण्यासाठी व्हिटॅमिन सी टॅब्लेट हा एक उत्कृष्ट मार्ग आहे. यासाठी गोळी पाण्यात मिसळा आणि नंतर त्यात केळी भिजवा.
टॅग्स : अन्नकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.