1 / 9कडधान्यांना मोड आणून खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. मोड आलेल्या कडधान्यांमध्ये प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स फार मोठ्या प्रमाण असल्यामुळे शरीरासाठी अत्यंत लाभदायक ठरतात. पण अनेकदा गृहिणींची ही तक्रार असते की, मोड लवकर (how to get long sprouts in one day) येत नाहीत किंवा ते चिकट होतात. कधी कधी तर दोन-दोन दिवस वाट पाहूनही कडधान्ये हवी तशी फुलत नाहीत. योग्य पद्धत आणि काही खास किचन टिप्स वापरल्या तर फक्त एका दिवसातच कडधान्यांना लांब, ताजे आणि कुरकुरीत मोड आणता येतात. कडधान्यांना पटकन आणि लांब मोड येण्यासाठी नेमक्या कोणत्या सोप्या टिप्स आहेत ते पाहूयात(quick sprouting method for pulses).2 / 9 कडधान्ये भिजवण्यासाठी नेहमी कोमट पाण्याचा वापर करावा, यामुळे ती लवकर फुगतात. साधारण ६ ते ८ तास भिजवल्यानंतर सकाळी त्यातील पूर्ण पाणी निथळून घ्यावे.3 / 9 कडधान्यांना मोड आणण्यासाठी कॅसरोल पद्धत ही सर्वात सोपी आणि उपयोगी पद्धत आहे. भिजवलेली कडधान्ये थेट कॅसरोलमध्ये ठेवून त्याचे झाकण घट्ट लावा. आतील उष्णतेमुळे अवघ्या ५ ते ६ तासांत कडधान्यांना लांब मोड येतात.4 / 9 पाणी निथळलेली कडधान्ये एका सुती कापडात घट्ट बांधून ठेवा. ही पुरचुंडी एखाद्या उबदार जागी (जसे की बंद ओव्हन किंवा किचन कॅबिनेट) ठेवा, जिथे हवेचा थेट संपर्क येणार नाही. या सोप्या ट्रिकमुळे कडधान्यांना लांब व कुरकुरीत मोड येतात. कडधान्ये ज्या भांड्यात किंवा कापडात बांधाल, तिथे त्यांना फुगायला पुरेशी जागा द्या, कारण मोड आल्यावर कडधान्याचा आकार दुप्पट होतो.5 / 9 लांब मोड येण्यासाठी कडधान्यांमध्ये थोडा ओलावा असणे गरजेचे असते. यासाठी कापड वारंवार उघडून पाहण्यापेक्षा, त्यावर अधूनमधून पाण्याचा हलका हबका मारावा.6 / 9कडधान्ये भिजवण्यापूर्वी ती ३ ते ४ वेळा पाण्याने स्वच्छ धुवावीत. तसेच मोड येण्यासाठी बांधताना त्यात जास्त पाणी राहणार नाही याची काळजी घेतल्यास कडधान्ये चिकट होत नाहीत.7 / 9 मटकी, मूग, चणा यांसारख्या कडधान्यांना भिजण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला पाहिजे. अर्धवट भिजल्यास कडधान्यांना मोड कमी येतात.8 / 9 कडधान्यांना मोड आणण्यासाठी पूर्ण बंद डब्यात ठेवू नका. थोडी खेळती हवा मिळाली तर मोड लांब आणि ताजे येतात. भांड्यात तुम्ही मोड आणायला ठेवणार आहात, ते भांडे पूर्णपणे कोरडे आणि स्वच्छ असावे, जेणेकरून कडधान्यांना कुबट वास येणार नाही.9 / 9 कडधान्ये भिजवताना पाण्यात चिमूटभर साखर घातल्यास मोड वेगाने वाढण्यास मदत होते.