Join us
Daily Top 2 Weekly Top 5

कढी फुटू नये यासाठी ७ टिप्स; हिवाळ्यात मारा गरमागरम कढीचा भुरका- खा कढीभात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 18:22 IST

1 / 7
घरी कढी करताना अनेकदा फुटते अशी बऱ्याचजांची तक्रार असते. यावर उपाय म्हणून काही टिप्स पाहू. कढीसाठी शक्यतो ताजं, फार आंबट नसलेलं दही वापरा. (How To Prevent Kadhi from Curdling)
2 / 7
बेसन दह्यात किवा ताकात घातल्यापूर्वी एका भांड्यात दही-ताक आणि बेसन एकत्र करून गुठळ्या राहणार नाहीत अशा प्रकारे फेटून घ्या.
3 / 7
कढी उकळण्यापूर्वी त्यात मीठ घालू नका. मिठामुळे कढी फुटण्याची शक्यता असते. मीठ आणि हळद नेहमी कढीला चांगली उकळी आल्यानंतर आणि ती चांगली शिजल्यानंतर घालावी.
4 / 7
कढी नेहमी मंद आचेवरच शिजवावी. जास्त तीव्र आजेवर ती लवकर फुटू शकते.
5 / 7
कढीला पहिली उकळी येईपर्यंत आणि 10 ते 15 मिनिटं एकाच दिशेनं ढवळत राहा ज्यामुळे कढी फुटत नाही.
6 / 7
कढी करण्यापूर्वी दही किंवा ताक किमान अर्धा तास आधी फ्रिजमधून काढून ठेवा. जेणेकरून रूम टेम्परेचरवर येईल.
7 / 7
कढी कधीही पातळ करावीशी वाटली तर त्यात थंड पाणी घालू नका. नेहमी गरम पाणी घाला.
टॅग्स : अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स