Join us
Daily Top 2 Weekly Top 5

कोणता तांदूळ वापरता? कुठल्या तांदळासाठी किती शिट्टी घ्याव्यात पाहा, मऊ-मोकळा शिजेल भात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 20:32 IST

1 / 6
आजकाल बऱ्याच घरांमध्ये लोक प्रेशर कुकरमध्ये भात (Rice) शिजवतात. काहीजण दोन काहीजण तीन तर काही लोक चार शिट्या घेतात पण भात शिजवताना कुकरच्या किती शिट्ट्या घ्याव्यात असा प्रश्न अनेकांना पडतो. कुकरमध्ये तांदूळ शिजवताना कुकरच्या किती शिट्या घ्याव्यात असा प्रश्न अनेकांना पडतो.
2 / 6
जर तुमच्याकडे बासमती तांदूळ असतील तर प्रेशर कुकरमध्ये 1 कप बासमती तांदूळ, दीड कप पाणी घाला आणि 1 ते 2 शिट्ट्या घ्या. जास्त शिट्ट्या घेतल्यास तांदूळ गचका होतो.
3 / 6
कोलम, सुरती किंवा उकडी तांदूळ असेल तर जेव्हाही तुम्ही प्रेशर कुकरमध्ये भात कराला तेव्हा एक कप भातात २.५ कप पाणी घाला आणि ४ ते ५ शिट्ट्या घ्या.
4 / 6
जर तुम्ही ब्राऊस राईस शिजवत असाल तर तो शिजायला अधिक वेळ लागतो. १ कप तांदळासाठी ३ कप पाणी हे प्रमाण घ्या आणि ५ ते ६ शिट्या घ्या.
5 / 6
जर प्रेशर कुकर मोठा असेल तर तुम्ही अतिरिक्त शिटी घेऊ शकता. जर तांदूळ, भाज्यांसोबत शिजवत असाल तर एखादी शिट्टी कमी घ्या. पाणी कमी किंवा जास्त घातल्यास शिट्टीचा आवाज बदलू शकतो.
6 / 6
जर तुम्ही जास्त प्रमाणात भात लावणार असाल तर १ कप तांदूळ आणि २ कप पाणी घालून २ ते ३ शिट्ट्या काढू शकता. ज्यामुळे तांदूळ फुलतील आणि मऊ होतील.
टॅग्स : कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न