1 / 8वांग्याची भाजी आणि भाकरी म्हणजे एकदम भारी बेत असतो. सगळ्यांनाच वांगं आवडत नाही, मात्र महाराष्ट्रात वांग्याला एक खास महत्व आहे. त्याचे विविध पदार्थ घरोघरी केले जातात. 2 / 8वांग्याची भाजी आणि इतर काही पदार्थ नक्की खाऊन पाहा. प्रत्येक रेसिपी चवीला वेगळी असते. भाजी जरी एकच असली तरी करण्याची पद्धत बदल्यावर चवीतही फरक पडतो. हे पदार्थ पाहा आणि तुम्हाला कोणता आवडतो ठरवा.3 / 8वांग्याचे भरीत फार लोकप्रिय असा पदार्थ आहे. घरोघरी केला जातो. भरीत ताकातले केले जाते, भाजून कच्चा कांदा घालून केले जाते. इतरही काही प्रकारे केले जाते. 4 / 8वांग्याची झटपट भाजी करताना त्यात बटाटा घातला जातो. आवडते मसाले घालायचे चवीला एकदम छान लागते. डब्यासाठी एकदम मस्त रेसिपी आहे. शिवाय व्हायला जास्त वेळ लागत नाही. 5 / 8वांग्याचे काप जर भातासोबत मिळाले तर और क्या चाहिए!! मसाला लावलेले, आलं-लसूण पेस्ट लावलेले तसेच रव्यात घोळवून केलेले असे प्रकार या पदार्थात आहेत. सगळेच मस्त लागतात.6 / 8वांग्याची तवा फ्रायही केली जाते. विविध मसाल्यांमध्ये वांग्याचे लांब काप परतायचे. थोडे पाणी घालून शिजवायचे. जरा कुरकुरीत होऊ द्यायचे. चवीला एकदम मस्त लागते. 7 / 8वांग्याचं ताकातलं कालवणही फार छान लागते. वांगी उकडून घ्यायची. मग ताकात घालायची त्याला मसाला लावायचा. चवीला एकदम मस्त लागते. नक्की करुन पाहा. करायला सोपी आहे. 8 / 8भरली वांगी तर नक्कीच करुन पाहा. फार चविष्ट भाजी आहे. नारळ, मसाले, दाण्याचे कुट असे सारे पदार्थ वापरुन सारण तयार करायचे. भाकरीसोबत फार छान लागते.