By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 15:34 IST
1 / 9आईस्क्रीम, डाएट सोडा, च्युइंगम आणि इतर शुगर फ्री प्रोडक्ट सर्व वयोगटातील लोकांमध्ये लोकप्रिय आहेत. ते दुकाने आणि मॉलमध्ये सहज उपलब्ध आहेत. एका नवीन रिसर्चनुसार, या शुगर फ्री पदार्थांमध्ये कृत्रिम स्वीटनर म्हणून सोर्बिटॉल असतं, जे लिव्हरसाठी हानिकारक आहे आणि फॅटी लिव्हर आजाराचा धोका वाढवू शकतं. 2 / 9युरोपियन मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या रिसर्चनुसार, शुगर फ्री किंवा डाएट प्रोडक्टमध्ये सोर्बिटॉल स्वीटनर लहान आतड्यात योग्यरित्या विघटित होत नाही, ज्यामुळे लिव्हरमध्ये फॅट जमा होतं आणि लिव्हरच्या कार्यावर परिणाम होतो.3 / 9तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, हे स्वीटनर्स, थेट नसले तरी, दीर्घकाळ सेवन केल्यास नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आजारचा (NAFLD) चा मोठा धोका वाढवू शकतात.4 / 9रिसर्चनुसार, दररोज अंदाजे एक कॅन डाएट सोडा किंवा शुगर स्वीटेड ड्रिंक प्यायल्याने नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आजाराचा धोका वाढतो. डाएट सोडा घेतल्यास हा धोका अंदाजे ६०% जास्त असतो आणि शुगर ड्रिंक घेतल्यास ५०% जास्त असतो. 5 / 9असंही दिसून आलं आहे की, निरोगी आतड्यातील बॅक्टेरिया सोर्बिटॉलचे विघटन करतात, परंतु जेव्हा हे बॅक्टेरिया कमी होतात किंवा संक्रमित होतात तेव्हा सोर्बिटॉल शरीरात जमा होऊ लागते.6 / 9सोर्बिटॉल थेट लिव्हरमध्ये जातो आणि तेथे फॅट जमा होण्यास कारणीभूत ठरतो, ज्यामुळे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोगाचा धोका वाढतो. पूर्वी, हा रोग सामान्यतः अल्कोहोलशी संबंधित होता, परंतु आता तो नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आजार म्हणून अधिक सामान्य झाला आहे.7 / 9डाएट सोडा आणि इतर कमी साखरेचे किंवा शुगर फ्री ड्रिंक प्यायल्याने लिव्हरच्या समस्या देखील उद्भवू शकतात कारण त्यात वापरले जाणारं कृत्रिम गोड पदार्थ आणि सोर्बिटॉल आतड्यातील बॅक्टेरियाचं संतुलन बिघडू शकतं.8 / 9मेटाबॉलिक सिंड्रोम, टाइप २ मधुमेह आणि हृदयरोगाचा धोका देखील वाढू शकतो. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की शुगर फ्री पर्याय नेहमीच आरोग्यदायी नसतात आणि लिव्हरच्या आजाराचा धोका देखील वाढवू शकतात.9 / 9आईस्क्रीम, डाएट सोडा आणि च्युइंगमसारख्या गोष्टींमध्ये वापरले जाणारे सोर्बिटॉल आणि इतर कृत्रिम गोड पदार्थ लिव्हरच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात, म्हणून त्यांचं सेवन मर्यादित केलं पाहिजे.