Join us

२०० रुपये प्लेट रंगात बरबटलेलं चायनिज खाता? घरी करता येतील असे ५ देसी चायनिज पदार्थ, खा मनसोक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2025 15:36 IST

1 / 8
भारतात चायनिज पदार्थ फार आवडीने खाल्ले जातात. पण भारतात मिळणारे चायनिज पदार्थ अस्सल चायनिज नसून त्याला आपण देसी चायनिज म्हणतो. त्याला इंडियन टच देऊन या रेसिपी आपण करतो.
2 / 8
हॉटेलमध्ये फार महाग मिळणारे काहील चायनिज पदार्थ आहेत जे खरंतर घरी करायला अगदी सोपे असतात. चायनिज तयार करताना आरोग्यासाठी हानिकारक असे अनेक पदार्थ त्यात वापरले जातात. त्यामुळे देसी चायनिज घरी तयार करुन खाणे एकदम बेस्ट.
3 / 8
घरी तयार करता येणारे हे ५ चानिज पदार्थ नक्की करा. जसे विकत मिळतात त्याहून मस्त चव घरच्या पदार्थांना असते. त्यामुळे विकतचे तेलकट सोडा आणि घरीच करा हे चमचमीत पदार्थ.
4 / 8
मंच्युरियन हा पदार्थ गल्लोगल्ली आवडीने खाल्ला जातो. व्हेज असो किंवा कोबी, दोन्ही प्रकार घरी करणे अगदीच सोपे आहे. तसेच घरी तळणीचे तेलही शुद्ध वापरले जाते. त्यामुळे मंच्युरियन बाधणार नाही.
5 / 8
आजकाल फार लोकप्रिय असलेला बर्न गार्लिक राईस घरी करायला अगदीच सोपा आहे. कष्ट फक्त लसूण सोलायचे. कारण या पदार्थासाठी भरपूर लसूण लागते.
6 / 8
शेजवान फ्राइड राईस करणे अगदी सोपे आहे. शेजवान चटणी आणि इतर भाज्या घालून भात परतायचा असतो. त्याला साधी फोडणी दिली तरी चालते. अगदी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. तांदूळ बासमती वापरावा.
7 / 8
मनचाव सूप थंडीच्या दिवसांसाठी एकदम मस्त रेसिपी आहे. घशाची खवखव आणि अडकलेली सर्दी सारेच गायब होते. हे झणझणीत सूप घरी करणे अगदीच सोपे. भरपूर भाज्या वापरा आणि मसाले घाला. तसेच कॉर्नफ्लावरची पेस्ट घालून घट्टपणा द्या.
8 / 8
फार प्रसिद्ध नसलेला एक स्टार्टर म्हणजे हनी चिली पोटॅटो. मध आणि मिरची घालून बटाट्याचे फ्राइज परतायचे. त्याला गोडसरपणा येतो आणि त्याला तिखट चवही असते. त्यात पांढरे तीळ घालायचे.
टॅग्स : अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स