पावसाळ्यात भाजलेल्या कणसासोबत हे पदार्थही खा, पाहा मक्याचे स्वादिष्ट पदार्थ
Updated:June 1, 2025 14:57 IST2025-06-01T14:51:58+5:302025-06-01T14:57:42+5:30
Eat these dishes during monsoon, see delicious corn dishes : पावसाळ्यासाठी खास यादी. मक्याच्या दाण्याचे करा हे मस्त पदार्थ. चवीला एकदम भारी.

पावसाळा सुरु झाल्यावर लगेच चहाची तलप लागते. पण फक्त चहाच नाही इतरही अनेक पदार्थ आहेत जे पावसाळ्यात खाण्याची मज्जाच काही और आहे. वडापाव, भजी, तळणीचे इतर काही पदार्थांना पावसाळ्यात फार मागणी असते.
आणखी एक पदार्थ आहे जो पावसात उभं राहून किंवा पाऊस बघत खाण्यात मज्जा येते. तो पदार्थ म्हणजे मक्याचे कणीस. छान भाजलेले कणीस तिखट, मीठ, लिंबू लावून खायला मिळाले की मग बासच!! मनसोक्त ते आपण खातो.
कणसाचे दाणे नुसते जरी मस्त लागले तरी त्याचे इतरही पदार्थ केले जातात. या पावसाळ्यात हे पाच पदार्थ नक्की करा. चवीला अगदी मस्त असतात. लहान मुलांना तर मेजवानीच होईल.
मक्याचे दाणे उकडवायचे. त्याचे कॉर्नचाट करायचे. छान कांदा, टोमॅटो, काकडी विविध मसाले मुख्य म्हणजे चाट मसाला असे पदार्थ घालून छान कॉर्नचाट करता येते. बाजारात महाग विकले जाते. पण अगदी कमी कष्टात घरी करता येतात.
मक्याचे सूप हा पदार्थ फार लोकप्रिय आहे. हॉटेलला गेल्यावर अनेक जणांची ऑर्डर ठरलेली असते. सूप म्हणजे कॉर्न सूपच. घरी करायला अगदीच सोपे आहे. छान लोणी घालायचे. म्हणजे अगदीच मस्त लागते.
उकडलेले मक्याचे दाणे घालून छान कुरकुरीत कटलेट करता येते. छान ताजे दाणे घ्यायचे. त्यात कांदा, मिरची, इतर आवडीचे पदार्थ घालायचे. ब्रेड क्रम्स घालायचे आणि छान टिक्की लावायची किंवा कटलेट करायचे.
बेसन पीठात मक्याचे दाणे आणि इतर काही पदार्थ घालून छान मक्याचे पकोडे किंवा भजी करता येतात. करायला फार सोपी अशी रेसिपी आहे. अगदीच कुरकुरीत होते.
मक्याचे दाणे घालून पराठा करता येतो. अगदी झटपट होतो. त्यात चीज घातले तर चव आणखी मस्त लागते. लहान मुलांना डब्यात देण्यासाठी अगदी मस्त रेसिपी आहे.