जिभेचे चोचले पुरवणारे ५ पदार्थ शुगर फ्री! झटपट रेसिपी; मन मारायला नको-मनात गिल्टही नको!

Updated:April 13, 2026 17:56 IST2026-04-13T17:39:36+5:302026-04-13T17:56:12+5:30

Eat guilt-free sweets, 5 recipes that will satisfy your sweet tooth : गोड खा ते ही साखरेशिवाय. पाहा ५ रेसिपी.

जिभेचे चोचले पुरवणारे ५ पदार्थ शुगर फ्री! झटपट रेसिपी; मन मारायला नको-मनात गिल्टही नको!

गोड खायची इच्छा झाली की आपण लगेच जास्त साखर असलेल्या डेझर्टकडे वळतो, पण थोडं विचारपूर्वक निवड केल्यास चव आणि पोषण दोन्ही मिळू शकतं. घरच्या घरी सहज करता येतील असे काही पौष्टिक डेझर्टचे प्रकार आहेत.

जिभेचे चोचले पुरवणारे ५ पदार्थ शुगर फ्री! झटपट रेसिपी; मन मारायला नको-मनात गिल्टही नको!

जसे की गुळाचा केक हा पारंपरिक चवीसोबतच आरोग्यदायी पर्याय ठरतो. साखरेऐवजी गूळ वापरल्यामुळे त्यात लोहासारखी खनिजे मिळतात आणि चवही अधिक नैसर्गिक लागते. गुळामुळे केक मऊ आणि हलका ओलसर राहतो, त्यामुळे तो खायला अधिक चविष्ट वाटतो.

जिभेचे चोचले पुरवणारे ५ पदार्थ शुगर फ्री! झटपट रेसिपी; मन मारायला नको-मनात गिल्टही नको!

फळांपासून बनवलेले डेझर्ट हा नेहमीच उत्तम पर्याय. मिक्स फ्रूट सॅलडमध्ये सफरचंद, केळी, पपई, डाळिंब अशी फळे एकत्र करून त्यात थोडं मध घातल्यास एक हलकं आणि पौष्टिक डेझर्ट तयार होतं. हे पचनासाठीही चांगलं असतं आणि शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे मिळवून देतं.

जिभेचे चोचले पुरवणारे ५ पदार्थ शुगर फ्री! झटपट रेसिपी; मन मारायला नको-मनात गिल्टही नको!

खजूर आणि ड्रायफ्रूट लाडू हा आणखी एक उत्तम पर्याय आहे. यात साखर न वापरता खजुराच्या गोडीवर लाडू बनवले जातात. बदाम, काजू, अक्रोड यांसारख्या सुकामेव्यामुळे त्यात प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स मिळतात. हे लाडू ऊर्जा देणारे आणि भरपूर पोषक असतात.

जिभेचे चोचले पुरवणारे ५ पदार्थ शुगर फ्री! झटपट रेसिपी; मन मारायला नको-मनात गिल्टही नको!

दही आणि फळांपासून बनवलेला फ्रूट योगर्ट किंवा पार्फे देखील चांगला पर्याय आहे. यात गोडसर दही, ताज्या फळांचे तुकडे आणि थोडे ओट्स किंवा ड्रायफ्रूट्स घातल्यास हा डेझर्ट हलका, थंडावा देणारा आणि पचनास मदत करणारा ठरतो.

जिभेचे चोचले पुरवणारे ५ पदार्थ शुगर फ्री! झटपट रेसिपी; मन मारायला नको-मनात गिल्टही नको!

रव्याचा किंवा गव्हाच्या पिठाचा हलवा कमी तुपात आणि गुळासोबत बनवला तर अधिक पौष्टिक ठरतो. यात थोडे ड्रायफ्रूट्स घातल्यास चव वाढते आणि शरीराला ऊर्जा मिळते. दुधावर करा किंवा पाण्यावर मस्तच लागतो.